शंकरपट, कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घाटन
अल्लीपूर : Sankarpat, kusti Spardha ग्रामीण खेळाला चांगले दिवस आणावयाचे असेल तर गावोगावी मातीचे खेळ व्हायला हवे. आखाड्यांमध्ये वेगवेगळ्या खेळांचेही आयोजन करण्यात येत असे. पण काळ बदलला आणि या सर्व जुन्या पद्धती हळूहळू लयाला जाऊ लागल्या, आता परिस्थिती अशी झाली आहे की शाळांमध्ये होणारे पीटीचे तासही टाईमपास करायचे तास मानले जाऊ लागले. भारतात क्रीडा सुविधा वाढल्या नाहीत आणि नवीन क्रीडा पद्धतींनीही आकार घेतलेला नाही. आपल्या राज्यात खूप गुप्त आणि सुप्त क्षमता आहे, जी बाहेर येण्यास उत्सुक आहे. क्रीडा क्षेत्रातील ग्रामीण भागातील क्षमता ओळखुन केंद्र व राज्य सरकारने नवीन क्रीडा धोरण स्विकारल्यामुळे खेळाला चांगले दिवस येऊ लागले आहेत. ग्रामीण खेळाचे महत्त्व वाढू लागले आहे. खेळ माणसाला विविध गोष्टी शिकवतो. त्यामुळेच खेळाचा उपयोग योग्य केल्यास त्याचा फायदा आपल्या सोबतच देशाला होतो. पहेलवानांनी लक्ष देवुन पुढे आपले लक्ष साध्य करावे असे आवाहन महाराष्ट्र कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी केले.
Sankarpat, kusti Spardha स्थानिक अल्लीपूर शंकर पट व्यवस्थापन कमेटी व वर्धा जिल्हा कुस्तीगीर तालिम संघाच्या वतीने आयोजित महिला व पुरुष गट राज्यस्तरीय कुस्ती दंगल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते व माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी वर्धा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मदनसिंग चावरे, जिपचे माजी अध्यक्ष नाना ढगे, माजी सदस्य अशोक सुपारे, वामन खोडे उपस्थित होते.
माजी खासदार तडस पुढे म्हणाले की, आमच्या आठवणीत एक काळ असा होता जेव्हा खेड्यातल्या जत्रेत कबड्डी, कुस्तीसह मातीतील खेळ खेळत होते. खेलो इंडिया, राज्यस्तरीय स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा मध्ये शहरासोबत ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळत आहे. ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जात आहे. खेळ कोणताही असो त्याचे असणारे फायदे असंख्य असतात. येथे होणार्या शंकरपटात कुस्ती स्पर्धा आयोजित करुन कुस्ती खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचीत मार्गदर्शन केले.
Sankarpat, kusti Spardha महिला व पुरुष गट राज्यस्तरीय कुस्ती दंगल स्पर्धा ४०,४६,५२,५८,६३,७० व खुला वजन गटात असुन महाराष्ट्रातील पुणे, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, सोलापूर, चंद्रपूर, भंडारा येथील १५० पेक्षा जास्त महिला व पुरुष पहेलवान सहभागी झाले आहे. विजयी पहेलवानांना अल्लीपूर शंकर पट व्यवस्थापन कमेटीच्या वतीने रोख रक्कम व ट्राफी देण्यात येणार आहे. यशस्वीतेकरिता शंकरपट व्यवस्थापन कमिटीचे श्रीराम साखरकर, गोपाल मेघरे, गोपाल गिरडे व वर्धा जिल्हा कुस्तीगीर तालिम संघच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला धनराज घुसे, उमेश बेलखेडे,विनोदभाऊ ठाकरे, प्रल्हाद चांभारे, अरुण वरणे, मधुकर महाजन, प्रवीण देशमुख, शंकर कामडी, रविंद्र वानी, चंदशेखर चांभारे, अशोक सुरकार, किरण ढगे, भुषण खंडरे, धिरज चांभारे, आकाश वांदिले, निलेश तपासे, आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.