गावातीलच तरुणाने Sawangi murder case मुलीचा गळा आवळून खुन केला. या प्रकरणात सावंगी पोलिसांनी प्रथम खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यात बदल करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला, असा आरोप मृत मुलीचे वडील प्रमोद देऊळकर, रा. सावली (वाघ) यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रमोद देऊळकर पुढे म्हणाले, मुलगी सावंगी येथील महाविद्यालयात बीसीए अभ्यासक्रमात शिक्षण घेत होती. रुग्णालय परिसरातच ती भाड्याने राहत होती. गावातीलच रोशन वावधने याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. तो सातत्याने तिला त्रास देत होता. प्रेमसंबंध ठेवण्यास आग्रह धरायचा. मात्र, मुलीने नकार दिला.
Sawangi murder case दरम्यान रोशनने भाड्याने राहत असलेल्या खोलीत तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. या प्रकरणी तक्रारीनंतर सावंगी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात रोशनला अटकही करण्यात आली. मात्र, नंतर या प्रकरणात सावंगी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पुरेशी चौकशी तसेच आमच्या सोबत चर्चा न करताच न्यायालयात दोषारोपपत्रदेखील दाखल केले. एकूणच या प्रकरणात सावंगी पोलिसांची भूमिका संशयास्पद असून मुलीस आरोपीने हत्येस प्रवृत्त केले नव्हे तर तिचा खुन करण्यात आल्याचा आरोप वडील प्रमोद देऊळकर यांनी केला. गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे न्यायाची मागणी केली असून या प्रकरणाचा खटला विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी चालविण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.