दहावी-बारावी परीक्षांसाठी दक्षता समिती

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
कॉपीमुत परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी
 
वर्धा:
Tenth and twelfth exams महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षा निकोप, गुणवत्तापूर्ण वातावरणात होण्यासाठी आता राज्यस्तरीय दक्षता समिती नियुत केली आहे. या परीक्षांमध्ये कॉपीमुत अभियान प्रभावीपणे राबवण्याबरोबरच तणावमुत वातावरणात परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी राज्यस्तरीय दक्षता समितीवर सोपवण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्हीचे नियंत्रण जिल्हा प्रशासनाकडे असेल.
 
 
exams
 
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यानुसार प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन केली आहे. दक्षात समितीच्या सदस्यांनी परीक्षा कालावधीत केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. विभागीय परीक्षा मंडळांनी उपद्रवी आणि संवेदनशील केंद्र ठरविलेल्या परीक्षा केंद्रांवर प्रभावी यंत्रणेची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. जिल्हास्तरावर दक्षता समिती कार्यरत असली, तरी राज्यस्तरावर समन्वय, नियंत्रण व प्रभावी अंमलबावणीसाठी स्वतंत्र राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन केली आहे.
 
 
 
Tenth and twelfth exams शिक्षण आयुतांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय दक्षता समितीमध्ये राज्य मंडळाचे अध्यक्ष सर्व विशेष पोलिस महानिरीक्षक, अतिरित आयुत, विभागीय आयुत सदस्य कार्यालय, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, शिक्षण योजना संचालक, राज्य मंडळ सचिवांचा समावेश आहे. परीक्षेच्या एक दिवस आधी केंद्रावरील भौतिक सुविधा व्यवस्थित असल्याची खात्री करणे, जिल्ह्यातील सर्व उपद्रवी, संवेदनशील केंद्राची माहिती संकलित करणे, परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षेशी संबंधित सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्हीची चित्रीकरणाची साठवणूक होत असल्याची खात्री करावी, असा आदेश देण्यात आला आहे.