स्वावलंबीनगर येथे उघड्या मॅनहोलमुळे अपघाताचा धोका

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Swavalambinagar राधेमंगलमकडून लंडन स्ट्रीटकडे जाताना स्वावलंबीनगर राम मंदिरासमोरील दिनदयाल नगरकडे जाणाऱ्या वळणावर असलेल्या मॅनहोलचे झाकण अर्धवट उघडे असून त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे.
 
Swavalambinagar
 
विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने हे उघडे मॅनहोल सहज दिसून येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. Swavalambinagar परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
 
स्थानिक रहिवाशांनी संबंधित महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मॅनहोलचे झाकण नीट बसवावे व आवश्यक ती सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. Swavalambinagar अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सौजन्य: राजेंद्र वाडी, संपर्क मित्र