“सरकारी इमारती ताब्यात घ्या!” ट्रम्प यांचा इराणमधील आंदोलकांना थेट आदेश

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
तेहरान,  
trump-gives-order-to-protesters-in-iran इराणमध्ये गेल्या 18 दिवसांपासून मोठे सरकारविरोधी आंदोलन सुरू असून महागाई, बेरोजगारी आणि प्रशासनाविरुद्ध लोक रस्त्यावर उतरले आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस अधिक चिघळताना दिसत आहे. आंदोलन थांबवण्यासाठी इराणी प्रशासनाने काही भागात आंदोलकांवर गोळीबार केला असून, या संघर्षात आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
 
trump-gives-order-to-protesters-in-iran
 
या परिस्थितीत अमेरिकेने थेट हस्तक्षेप करत आंदोलन भडकवले आहे.  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर व्हिडीओ आणि पोस्टद्वारे आंदोलकांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. trump-gives-order-to-protesters-in-iran ट्रम्प यांनी आंदोलकांना सरकारी इमारती ताब्यात घेण्याच्या थेट सूचना दिल्या आहेत तसेच “तुमची लढाई शेवटच्या टप्प्यात असून विजय तुमचा आहे” असे संदेश दिले आहेत. इराण सरकारनेही अमेरिकेसोबत लढण्यासाठी तयारी असल्याचे सांगितले असून, दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इंटरनेट बंदीसारखे उपाय करून सरकारने जनतेच्या संपर्कावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिकेने ट्रम्पच्या आदेशानुसार मदतीचा दावा करत आंदोलनाला चालना दिली.
सध्या परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून, आंदोलनाच्या ठिकाणी जाळपोळ, उग्र आंदोलन आणि गोळीबार सुरू आहेत. रुग्णालयांबाहेर मृतदेहांचा खच पाहायला मिळत आहे. trump-gives-order-to-protesters-in-iran जागतिक स्तरावरही इराणशी व्यापार करणाऱ्या देशांच्या आर्थिक व्यवहारांवर याचा मोठा परिणाम होत आहे. अस दिसत आहे की, इराण आणि अमेरिकेतील संघर्ष आता टोकाला पोहोचत आहे आणि जागतिक स्तरावर याचे गंभीर परिणाम भेडसावू शकतात.