वर्धा,
Wardha: Municipal Election साधारणत: नगर पालिका निवडणुकीत दुखावलेल्यांना किंवा आतल्या गोटातील व्यतीला स्वीकृत सदस्यपद देण्याचा आजपर्यंतचा पायंडा होता. यावेळी सर्व प्रकारची राजीनाराजीचा विचार करण्यात आला. वर्धा नगर पालिकेत १५ रोजी होणार्या स्वीकृत सदस्यपदाकरिता भारतीय जनता पार्टीकडून तीन नावांवर शिका मोर्तब झाले. दरम्यान, उपाध्यक्षपदाची लॉटरी कोणाची अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
वर्धा नगर पालिकेत २० प्रभागातून ४० नगरसेवक निवडून आले आहेत. यात भारतीय जनता पार्टीचे २५, काँग्रेसचे ५, ५ शरद पवार गट, २ राकाँ, १ माकप तर अपक्ष २ नगरसेवकांचा समावेश आहे. राज्यातील महायुती वर्धा नगर पालिकेत निवडणूक निकालानंतर कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि १ अपक्ष असे मिळून २८ नगरसेवकांचा भारतीय जनताप पार्टीने गट तयार केला.
Wardha: Municipal Election जिल्ह्यात सर्वात लांबलचक आणि मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी असल्याने नगर पालिका निवडणुकीत नगरसेवक पदाकरिता इच्छूकांची मोठी रांग होती. मात्र, प्रत्येकालाच तिकीट देणे शय नसल्याने नाराजीचा सूर सर्वत्र उमटला. त्यावेळी नाराज असलेल्यांना स्वीकृत सदस्यपदी नियुतीचे आश्वासन दिले होते. दरम्यान, भाजपाने आणि सरकारनेही काही अटी व शर्थी ठेवल्याने अनेकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेले. अखेर, उद्या १५ रोजी सकाळी नगर पालिकेत स्वीकृत सदस्यपदाकरिता निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पार्टीकडून जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्या स्वाक्षरीचे पत्र समाजमाध्यमांवर सकाळपासुन फिरते आहे. दरम्यान, आज दुपारी भारतीय जनता पार्टीकडून निलेश पोहेकर, प्रशांत बुर्ले, कमलेश आकरे यांनी अर्ज दाखल केले. ही निवडणूक जवळपास बिनविरोध होणार असल्याने बुर्ले, पोहेकर आणि आकरे यांच्या नावावर स्वीकृत सदस्य म्हणून शिकामोर्तब झाला असल्याचे म्हटल्या गेल्यास चुकीचे ठरू नये. दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत आघाडीतील नाव असलेले प्रदीप ठाकूर हे भाजपाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार होण्याची शयता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाकडे १ स्वीकृत सदस्यपद मागितले असल्याची माहिती संतोषसिंग ठाकूर यांनी दिली.