नागपूर पतंग महोत्सवात महिलांचा सक्रिय सहभाग

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur Kite Festival नागपूरमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरभर पतंग उत्सव रंगले आहेत. विशेषत: महाल परिसरात हा उत्सव प्रचंड उत्साहात बघायला मिळतो. शहरातील विविध भागांत मुलं, तरुण-तरुणी आणि मोठमोठ्या प्रमाणात महिलांचा सक्रिय सहभाग दिसून येतो, ज्यामुळे संक्रांतीच्या आनंदात आणखी भर पडली आहे.
 
Nagpur Kite Festival
 
पतंग उडवताना लोक परंपरा, आनंद आणि एकत्रिततेचा अनुभव घेत आहेत. स्थानिकांनी सांगितले की, पतंग उत्सवामुळे समाजातील सर्व वयोगटातील लोकांमध्ये सुसंवाद आणि उत्साह निर्माण होतो. Nagpur Kite Festival शहरातील नागरिक आणि परिवार या रंगीबेरंगी वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत आहेत, तर सामाजिक संघटनाही सुरक्षित पतंग उडवण्याचे आवाहन करत आहेत. या उत्सवातून नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेला चालना मिळत आहे, आणि महिलांचा सक्रिय सहभाग या आनंदाला दुपटीने वाढवतो आहे.
सौजन्य: भूषण चावरकर, संपर्क मित्र