‘गप्प बसल्याने धोका कमी होत नाही’; इराण-अमेरिकेच्या वादात भारताची टीका

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
तेहरान,  
india-over-iran-us-dispute इराणमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या तीव्र आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आता तेहरानवर अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याची छाया गडद होत आहे. अमेरिकेकडून लष्करी कारवाईची शक्यता व्यक्त होत असतानाच इराणनेही आक्रमक भूमिका घेतली असून, हल्ला झाल्यास अमेरिकेच्या तळांवर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतातील इराण दूतावासाने महत्त्वपूर्ण आणि थेट भूमिका मांडली आहे.
 
india-over-iran-us-dispute
 
भारतामधील इराणच्या दूतावासाने ‘एक्स’ (माजी ट्विटर)वर केलेल्या पोस्टमध्ये अमेरिकेच्या एकतर्फी धोरणांवर कठोर टीका केली आहे. अमेरिकेने टॅरिफ लादण्यापासून ते आंतरराष्ट्रीय संस्थांमधून माघार घेण्यापर्यंत सातत्याने जागतिक नियमांचे उल्लंघन केली असल्याचे दूतावासाने नमूद केले. अशा कारवायांबाबत देशांनी गप्प बसणे किंवा निष्क्रिय राहणे धोक्याला कमी करत नाही, तर तो अधिकच वाढवते, असा इशाराही देण्यात आला आहे. india-over-iran-us-dispute दूतावासाच्या निवेदनानुसार, चुकीच्या पद्धतीने टॅरिफ लादणे आणि तब्बल ६६ आंतरराष्ट्रीय संस्थांमधून अमेरिकेने माघार घेणे, यामुळे सध्याच्या जागतिक व्यवस्थेचे नियम मोडीत निघत आहेत. ही धोरणे केवळ काही देशांपुरती मर्यादित न राहता भविष्यात सर्वच देशांवर परिणाम करतील, मग ते देश आकाराने लहान असोत किंवा आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असोत, असेही दूतावासाने स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिकेने भारतासह अनेक देशांवर आयात शुल्क लादले आहे. भारतावर आधी २५ टक्के टॅरिफ लावण्यात आला होता, त्यानंतर तो वाढवून ५० टक्के करण्यात आला. याशिवाय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली असून, त्यानुसार ६६ आंतरराष्ट्रीय संस्था, एजन्सी आणि आयोगांना दिला जाणारा अमेरिकी पाठिंबा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांशी संबंधित काही संस्थांसह भारत आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल सोलर अलायन्सचाही यामध्ये समावेश आहे.
 सौजन्य : सोशल मीडिया
इराणवर हल्ला झाल्यास ते अमेरिकी लष्करी तळांवर प्रत्युत्तर देईल, असा स्पष्ट इशारा तेहरानकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मध्य पूर्वेतील आपल्या तळांवरून काही कर्मचाऱ्यांना हलवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती एका अमेरिकी अधिकाऱ्याने दिली आहे. india-over-iran-us-dispute ही माहिती त्या वक्तव्यानंतर समोर आली, ज्यात एका वरिष्ठ ईरानी अधिकाऱ्याने सांगितले होते की, वॉशिंग्टनकडून हल्ला झाल्यास अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला जाईल, असा इशारा शेजारी देशांनाही देण्यात आला आहे. दरम्यान, इराणी चलन रियाल ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर गेल्या महिन्यात तेहरानमध्ये आंदोलनांना सुरुवात झाली होती. सुरुवातीला आर्थिक संकटाविरोधात सुरू झालेले हे आंदोलन आता संपूर्ण देशभर पसरले असून, ईरानच्या सर्व ३१ प्रांतांमध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत. हळूहळू या आंदोलनांनी राजकीय बदलांच्या मागणीचे स्वरूप घेतल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे.