भाजपाचे उमेदवार शिंगणे यांच्यावर हल्ला

- काँग्रेस पदाधिकारी गणेश चातारकरवर गुन्हे दाखल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Bhushan Shingane : नागपुरात प्रभाग 11 मधील भाजपचे उमेदवार व माजी नगरसेवक भूषण शिंगणे यांच्यावर बुधवारी मध्यरात्री काँग्रेसचे पदाधिकारी गणेश चाचेरकर आणि त्यांच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला. यात त्यांच्या हाताला, ताेंडाला गंभीर जखम झाली असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी काँग्रेस उमेदवार चाचेरकर व कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आराेप केला आहे. त्यांनी हल्लेखाेरांवर तात्काळ कारवाईची मागणी पाेलिस आयुक्ताकडे केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या घटनेची माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर जखमी असलेल्या भूषण शिंगणे यांची घरी जाऊन भेट घेऊन विचारपूस केली.
 
 
 
shingane
 
 
 
गाेरेवाडा भागात पैशांचे वाटप हाेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजपाचे उमेदवार भूषण शिंगणे दाेन कार्यकर्त्यांसह त्या भागात गेले हाेते. शिंगणे यांना बघताच तिथे उपस्थित 50-60 काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर तसेच त्यांच्यासाेबत असलेल्या तीन भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. यात एक सहकारी खाली पडल्याने शिंगणे त्यांना उचलण्याकरिता खाली वाकले. भूषण शिंगणे यांनाही जमिनीवर पाडून त्यांच्या चेहèयावर दगडाने मारण्यात आले. चेहऱ्याचा बचाव करताना हात पुढे केले असता हातावर दगडाने मारण्यात आले. त्यांचे ओठ ाटले असून त्यांच्या पायावरही मारहाण करण्यात आली.
 
 
शिंगणे यांना मेयाे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हाताला व पायाला फ्रॅक्चर असल्याचे एक्स रेमधून निदान झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहे. हल्ला करणाèयांवर तात्काळ कारवाईची मागणी पाेलिस आयुक्ताकडे तिवारी यांनी केली या घटनेचा भाजपने निषेध व्यक्त केला.
 
भाजप उमेदवार शिंगणे यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गणेश चाचेरकरसह 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गिट्टीखदान पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. आराेपींना ताब्यात घेऊन चाैकशी करण्यात येणार आहे.
- कैलाश देशमाने (ठाणेदार, गिट्टीखदान पाेलिस स्टेशन)
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट
 
कोणतीही निवडणूक असो, भाजपच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचा मी प्रयत्न करत असतो. यावर्षीही तो नित्यक्रम कायम ठेवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
नागपूरच्या गोरेवाडा परिसरात भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला, त्यांना सोडणार नसल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी भूषण शिंगणे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या प्रकरणात आधीच पोलिसांकडे स्थानिक नेत्यांनी तक्रार दिली होती , यात पोलिसांनी काहीही हलगर्जीपणा केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.