“माझं नाव कुठे?”...सराफसुद्धा मतदानात हरवल्या!

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
मुंबई,
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज विलेपार्ले येथे धक्कादायक प्रकार घडला. प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मतदार यादीतील गोंधळामुळे मतदानासाठी तब्बल एक तास केंद्रावरून केंद्रावर फेरफटका मारावा लागला. सराफ यांनी निवडणूक आयोगाच्या नियोजनावर टीका करत सांगितले, “निवडणूक आयोगाचा कारभार अत्यंत ढिसाळ आहे. मी मतदान केंद्रावर गेले तेव्हा माझे नाव मतदार यादीत नव्हते. मला २५ नंबरला जाण्यास सांगण्यात आले. तिथे नाव सापडले, पण त्या वेळी निवडणूक कर्मचारी गेल्या होत्या. मोबाईल आत घेऊ दिला नाही, नाहीतर फोटो काढला असता.”
 
 
 
BMC Election 2026
 
सराफ यांनी स्पष्ट केले की, सोसायटीचे गट पाडले असून त्या गटातील मतदार तिथे मतदान करतील, परंतु त्यांच्या बिल्डिंगची नावे यादीत नव्हती. त्यामुळे सामान्य मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र उभे राहिले.
 
 
याच प्रकारच्या गोंधळामुळे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांचे कुटुंबीय देखील मतदान केंद्रावर आपले नाव शोधत थोडा वेळ घालवावा लागला, त्यानंतर ते मतदान करू शकले. या घटनांनी मुंबईत मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.