मतदान सुरू असतानाच गोंधळ; नाशिकमध्ये हल्ला, धुळ्यात ईव्हीएमवर हातोडा

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
मुंबई,
EVMs attacked with a hammer in Dhule. राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी आज (१५ जानेवारी) मतदान प्रक्रि१ या सुरू असतानाच नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून हिंसाचार व गोंधळाच्या घटना समोर आल्या आहेत. नाशिकमध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला झाल्याची घटना घडली असून, धुळे शहरात थेट मतदान यंत्राची तोडफोड झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजप उमेदवार नितीन खोले यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नितीन खोले हे मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत त्यांच्या घरावर धाव घेतली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणातून शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने काही काळ परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसून आली.
 
 
EVMs attacked
दरम्यान, धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील एका मतदान केंद्रावर गंभीर प्रकार घडला. मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रातील खोली क्रमांक १ मध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात शिवीगाळ करत ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला असून, काही काळासाठी मतदान प्रक्रिया थांबवावी लागल्याचे सांगण्यात येत आहे.
 
याच दरम्यान नाशिकच्या प्रभाग क्रमांक २४ मध्येही मतदान केंद्रावर गोंधळ झाला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांकडून धनुष्यबाण चिन्हावर बटण दाबल्यानंतर ईव्हीएममध्ये भाजपचा लाईट लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भात मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकावले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही घटना प्रभाग क्रमांक २४ मधील ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर घडली. या सर्व घटनांमुळे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाकडून घटनांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.