गोंदिया पालिकेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे संतोष पटले

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
पाच स्विकृत नगरसेवकांचीही निवड

गोंदिया, 
Gondia Municipality Election: Vice President  Santosh patale नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी नगर परिषदेत आज गुरुवार 15 जानेवारी रोजी सभा बोलावली होती. सभेत उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांचीदेखील निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष पटले यांची वर्णी लागली. तब्बल 46 महिन्यांपासून येथील नगर परिषदेवर प्रशासक राज होता. गोंदिया नगर पालिकेत 44 नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाकरिता 2 व 20 डिसेंबर रोजी निवडणूक झाली. 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला. नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसचे सचिन शेंडे निवडून आले. काँग्रेसचे 14, भाजप 18, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) 5, शिवसेना उबाठा गटाचे व बसपाचे प्रत्येकी 2 व अपक्ष 3 नगरसेवक निवडून आले.
 
 
santosh
 
Gondia Municipality Election: Vice President Santosh patale नगर परिषदेत ओढताण करूनदेखील काँग्रेसला सत्ता स्थापन करता येत नव्हती. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान केले. त्यात भाजपचे संतोष पटले यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. तसेच भाजपने जितेंद्र (बंटी) पंचबुद्धे आणि घनशाम पानतवणे, काँग्रेसने प्रफुल्ल अग्रवाल आणि अजय अग्रवाल, तर राष्ट्रवादी काँग्रेसने लोकेश (कल्लू) यादव यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली. भाजपमध्ये स्वीकृत सदस्य आणि उपाध्यक्षपदाच्या नावावरून 14 जानेवारी रोजी आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरापुढे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत हरकत घेतली होती. मात्र, नाराजी दूर सारत अखेर गुरुवारी नावांची घोषणा करण्यात आली.
 

तिरोडा नगर पालिकेत देखील आश्चर्यकारक निकाल लागला होता. याठिकाणी भाजपने सहा नगरसेवकांसह नगराध्यक्ष निवडून आणला. मात्र, सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादीकडे 12 नगरसेवक होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश गुणेरीया यांची उपाध्यक्ष म्हणून निवड होण्याची अधिक शक्यता आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर केले नाही. गोरेगाव नगर पंचायतीच्या स्वीकृत सदस्य निवडीवेळी झालेल्या गोंधळाची येथे पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता सावध पवित्रा घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.