वाळू तस्करीचे चित्रीकरण करणार्‍या पत्रकारास मारहाण

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
माहूर,
तालुक्यात Illegal sand smugglers अवैध वाळू तस्करीला ऊत आला अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या वाहनाचे चित्रीकरण करीत असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य सदानंद पुरी यांना वाळू तस्करांनी मारहाण करून त्यांचा मोबाईल फोडल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी सदानंद पुरी यांच्या तक्रारीवरून वाळू तस्करांविरोधात माहूर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने माहूर शहरासह तालुक्यात सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून याबाबत जनतेतून तीव्र  संताप व्यक्त केला जात आहे.
 
 
Illegal sand
 
Illegal sand smugglers तक्रारदार सोमवारी रात्री ९ वाजता घराकडे जात असताना शासनाचे नियम धाब्यावर बसवून अवैधरित्या वाळू तस्करी करणारे वाहन दिसताच पुरी यांनी आपल्या मोबाईलमध्ये या वाहनाचे चित्रीकरण केले. वाहन चालकाने फोनद्वारे ही माहिती टिप्पर मालकास दिली. टिप्पर चालक त्याच्या साथीदारांनी तक‘ारदारास रस्त्यात अडवून टिप्परचे फोटो का काढले, अशी विचारणा करून वाद घालत अर्वाच्य शिवीगाळ करुन वाद घालत मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता तक्रार दाराच्या हातातील मोबाईल हिसकावून जमिनीवर आदळून फोडला. यामध्ये तक‘ारदाराचे २३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेनंतर सदानंद पुरी यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन माहूर पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास मडावी करीत आहेत.