IND vs NZ: भारताचा पराभव का झाला? शुभमन गिलने स्पष्ट केली कारणे

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
राजकोट,  
ind-vs-nz राजकोटमध्ये सुरू असलेली भारतीय संघाची विजयी मालिका अखेर खंडित झाली. १४ जानेवारी रोजी झालेला हा सामना भारतीय संघासाठी पूर्णतः निराशाजनक ठरला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारताला न्यूझीलंडकडून मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भारताकडे होती, मात्र किवी संघाने ती संधी हिसकावून घेतली.
 
ind-vs-nz
 
न्यूझीलंडच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला डेरिल मिचेल. ind-vs-nz त्याने साकारलेल्या दमदार १३१ धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ७ विकेट्स राखून सामना जिंकला. भारताकडून केएल राहुलने केलेले शानदार शतकही अखेर अपुरे ठरले. या पराभवानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी विशेषतः मधल्या षटकांमध्ये अत्यंत कमकुवत दिसून आली. विकेट्स न मिळाल्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सामन्यावर पूर्ण पकड मिळवली. सामन्यानंतर बोलताना कर्णधार शुभमन गिलने पराभवाची कारणे स्पष्ट शब्दांत मांडली. मिडिल ओव्हर्समध्ये विकेट्स काढण्यात अपयश येणे हीच सर्वात मोठी अडचण ठरल्याचे त्याने मान्य केले. एकदा फलंदाज सेट झाला की त्याला रोखणे कठीण जाते आणि अशा वेळी १५-२० धावा जास्त दिल्या तरी त्याचा मोठा परिणाम होतो, असे गिल म्हणाला.
इनसाइड सर्कलमध्ये पाच फील्डर्स असतानाही मधल्या षटकांत विकेट्स न मिळणे संघासाठी महागात पडल्याचेही त्याने नमूद केले. गिलच्या मते, अशा प्रकारच्या खेळपट्टीवर एकदा भागीदारी जमली की अनुभवी फलंदाज मोठी खेळी सहज उभारतो, तर नव्या फलंदाजाला सुरुवातीपासूनच धावा काढणे अवघड जाते. ind-vs-nz सामन्याच्या पहिल्या १० ते १५ षटकांत चेंडूला थोडीफार हालचाल मिळत होती, मात्र त्या टप्प्यावर भारतीय गोलंदाजांकडून अपेक्षित आक्रमकता दिसली नाही, ही मोठी चूक ठरल्याचे त्याने स्पष्ट केले. याशिवाय फिल्डिंगमधील त्रुटींवरही कर्णधाराने नाराजी व्यक्त केली. मागील सामन्याप्रमाणेच यावेळीही काही सोपे झेल सुटले, ज्याचा फायदा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी घेतला आणि सामन्यावर आपली पकड अधिक मजबूत केली. शुभमन गिलच्या प्रतिक्रियांवरून हे स्पष्ट होते की आगामी सामन्यांमध्ये टीम इंडियाला मधल्या षटकांतील गोलंदाजी, विकेट घेण्याची ठोस रणनीती आणि फिल्डिंग या तिन्ही बाबींवर विशेष भर द्यावा लागणार आहे. २०२७ च्या विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही सुधारणा भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.