शिवसेनेत अंतर्गत वाद; दानवेला अक्कल नाही..." खैरे-दानवे वाद उफाळला

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर,  
haire-danve-dispute छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मतदानादरम्यान शिवसेनेतील जुना वाद पुन्हा उफाळून बाहेर आला. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर थेट टीका करत त्यांची "अक्कल" काढली.
 
haire-danve-dispute
 
मतदानानंतर माध्यमांशी बोलताना खैरे म्हणाले की, पक्षात गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस सुरू होती, ती आज मतदानाच्या दिवशी स्पष्ट झाली. खैरे म्हणाले की, माजी महापौर रशीद मामूंना मिळालेले तिकीट मला देण्यात आले नाही, तर ते अंबादास दानवे यांनी वाटप केले. haire-danve-dispute "तिकीट वाटप करताना मला अंधारात ठेवण्यात आले आणि दानवे यांनी स्वतःच्या मनमानीत निर्णय घेतला," असे त्यांनी स्पष्ट केले. खैरे पुढे म्हणाले, "मी पक्षात एकनिष्ठ राहिलोय. दानवे यांनी आतले काय व्यवहार केले आहेत हे मला ठाऊक आहे. जे निष्ठावंत सदस्य होते त्यांची तिकिटे कापली गेली," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मकरसंक्रांतीनिमित्त पालकमंत्री संजय शिरसाठ यांना पत्रकारांनी विचारले की, "आज तिळगुळ कोणाला देणार?" त्यावर शिरसाठ म्हणाले की, ते शिवसेनेचे निष्ठावंत चंद्रकांत खैरे यांना देणार, अंबादास दानवे यांना नाही. दानवे यांनी या वक्तव्यावर उत्तर दिले की, "खैरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिरसाठ यांचे काम केले आहे, म्हणून त्यांना तिळगुळ दिले जात आहे." यानंतर खैरे संतापले आणि म्हणाले, "दानवे कळत नाही का? मी गद्दारी करणारा माणूस नाही." त्यांनी सांगितले की, दानवे मागील चार दिवसांपासून प्रचारात गायब आहेत आणि ही बाब त्यांनी मातोश्रीपर्यंत पोहोचवली आहे. haire-danve-dispute खैरे यांनी इशारा दिला, "मतदान झालं की मी अंबादास दानवे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन सर्व सत्य बाहेर काढणार आहे."