जय महाकालीतर्फे अनासपुरे यांना महाराष्ट्र भूषण तर पवार यांना समग्र ग्रामविकास सन्मान प्रदान
वर्धा,
Jai Mahakali: Anasapure and Pawar were honored. भुकेचा अग्नी शमविल्याशिवाय समृद्धीचा मार्ग निर्माण होऊ शकत नाही. माणसाच्या आत्ममानाची संवेदना जाणून घेणे आवश्यक असून कोणतेही कार्य प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. राजा भरीरथाने गंगा पृथ्वीवर आणली हा पाणलोटचा पहिला प्रयोग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या युगाला अध्यात्माशी जोडून शिक्षणातून आनंद निर्माण करावा असे आवाहन पद्मश्री पोपटरावजी पवार यांनी केले.
जय महाकाली शिक्षण संस्थेच्या वतीने अग्निहोत्री महाविद्यालयाच्या शिवशंकर सभागृहात आज १५ रोजी आयोजित सेवा सत्कार समारोहात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेते तसेच नाम फाउंडेशनचे विश्वत मकरंद अनासपुरे होते. अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री होते. देवळीचे आमदार राजेश बकाने यांची प्रमुख उपस्थिती होती तर संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, पूजा अग्निहोत्री, आदींची उपस्थिती होती.
Jai Mahakali: Anasapure and Pawar were honored. मकरंद अनासपुरे यांनी ग्रामीण भागाला सधन संपन्न व सशत करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. ग्रामीण विकासामुळे रोजगार निर्मिती, शेती सुधारणा आणि मूलभूत सुविधा सुधारतात. पंचायतराज संस्था आणि विकेंद्रीकरणाद्वारे स्वयंपूर्ण गावे घडवता येतात, ज्यामुळे दारिद्रय आणि बेरोजगारी कमी होत असल्याचे ते म्हणाले. पं. अग्निहोत्री म्हणाले की, शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे सर्वात प्रभावी साधन आहे. ते व्यक्तींमध्ये जागरूकता, समानता आणि जबाबदारी निर्माण करून सामाजिक प्रगतीस चालना देते. शिक्षण केवळ व्यक्तिगत फायद्यासाठी न करता सामाजिक कल्याणासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सामाजिक तसेच वर्धा शहराच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या व्यतींना एक लाख रुपये पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येईल अशी घोषणा केली.
सचिन अग्निहोत्री यांनी जय महाकाली शिक्षण संस्थेचे कार्य केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरतेच मर्यादित नसून सामाजिक विकासासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी मकरंद अनासपुरे यांना महाराष्ट्र भूषण तर पद्मश्री पोपटराव पवार यांना समग्र ग्रामविकास सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पदवी डॉटर ऑफ सायंस (डी. एस्सी) प्राप्त केल्याबद्दल डॉ. गजानन जंगमवार यांचा तसेच आचार्य पदवी प्राप्त करणारे डॉ. जयश्री दलाल, डॉ. स्वाती ठाकरे , डॉ. गणेश बेले, डॉ. सचिन बलवीर, डॉ. लक्ष्मण जाजोदिया, डॉ. प्रमोद नारायणे, डॉ. सुनीता लांजेवार, डॉ. हुमेरा काझी, यांना विद्याभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
संचालन तसेच आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ.चंदकांत कोठारे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. प्रसाद जुमळे, डॉ. दिनेश वंजारी, डॉ. दीपक पुनसे, डॉ. निरजसिंग यादव, डॉ. रितेश सुळे, डॉ. प्रिया मिश्रा, डॉ. अनिल महल्ले, प्रा. स्वरा अष्टपुत्रे, गजानन दांदडे, अनिल नरेडी, अभिजित रघुवंशी, गणेश काळे यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.