Mahavitaran-Urja Chatbot : डिजिटलायझेशनच्या युगात महावितरणने आपल्या सेवा अधिक ग्राहकस्नेही केल्या असून, Mahavitaran Urja Chatbot महावितरणच्या ‘मोबाईल अॅप’ला वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकार्यांनी सांगितलेे. नवीन वीज कनेक्शन घेण्यापासून ते वीज बिल भरणे, तक्रारी नोंदवण्यापर्यंतच्या सर्व सुविधा आता ग्राहकांच्या आल्या आहेत. गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करणार्यांची संख्या ५० लाखांच्या पार गेली असून, अॅपल स्टोअरवरही लाखो ग्राहकांनी याला पसंती दिली आहे.
सध्या ४० लाखांहून अधिक ग्राहक या अॅपचा नियमित वापर करत असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या अॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे Mahavitaran Urja Chatbot ‘ऊर्जा चॅटबॉट’, ज्याच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तात्काळ मिळतात. ग्राहकांना आता नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे व शुल्क भरणे रांगेत उभे न राहता घरबसल्या शक्य झाले आहे.
स्वतःच भरा मीटर रीडिंग
अनेकदा मीटर रीडिंग घेण्यास विलंब झाल्यास ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, या अॅपमुळे ग्राहक आता स्वतःच्या मीटरचे अचुक स्वतःच पाठवू शकतात. याशिवाय वीज बिल पाहणे, ते भरल्यानंतरची पोचपावती मिळवणे व जवळचे बिल भरणा केंद्र शोधणे ही कामे अत्यंत सुलभ झाली आहेत.
पारदर्शकतेवर भर
Mahavitaran 'Urja Chatbot वीज चोरीची माहिती गुप्तपणे देणे, नादुरुस्त रोहित्राबाबत कळवणे, वीज खंडित झाल्यास तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा करणे यांसारख्या सुविधांमुळे महावितरणच्या कारभारात पारदर्शकता आली आहे. सौर पंपाच्या अर्जाची सद्यस्थिती व मासिक वीज देयकाचा अंदाजित तपशीलही यावर उपलब्ध आहे. वापरण्यास अत्यंत सोपे व सुरक्षित या अॅपचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.