बालविकास शाळेच्या ‘गणितीय’ परसबागेचा जिल्हास्तरावर डंका

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
तालुयात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय
 
मालेगाव :
येथील बालविकास मंदिर प्राथमिक शाळेने शासनाच्या 'Majhi sala Majhi parasabag' spardha ‘माझी शाळा माझी परसबाग’ स्पर्धेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. गणितातील भौमितिक आकार आणि सेंद्रिय शेती व विज्ञान यांचा सुरेख संगम साधत शाळेने तालुयात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
 
 
Majhi
 
शिक्षण आणि निसर्गाची सांगड घालून मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे व परसबाग प्रमुख नंदकिशोर भुसारी यांच्या कल्पनेतून विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने ही अनोखी बाग साकारली आहे. यात त्रिकोणी, चौकोनी, आयाताकार, षटकोनी आणि वर्तुळाकार वाफ्यांमध्ये मेथी, पालक, कोथिंबीर, आंबटचुका, शेपू, कोबी, टमाटर, वांगी, कांदा, लसूण, आणि विविध वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर आणि स्वतः तयार केलेले सेंद्रिय खत वापरून ही बाग पूर्णपणे रसायनमुक्त (जैविक)ठेवण्यात आली आहे. सदर बागेतून मिळणार्‍या ताज्या पालेभाज्यांचा वापर रोजच्या शालेय पोषण आहारात केला जातो. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण आणि विषमुक्त आहार या संकल्पनेमुळे या उपक्रमाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.
 
 
'Majhi sala Majhi parasabag' spardha संस्थाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. विजय जाधव, गटशिक्षणाधिकारी गजानन परांडे, गणेश देव्हडे यांनी या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन केले. या यशात शिक्षक विठ्ठल कुटे, अनिल सरकटे, जिजेबा घुगे, गणेश शिंदे, अमोल बोडखे, इब्राहिम रेघीवाले, गणेश इढोळे, योगेश वाळूकर, संदीप कांबळे, केशव इंगळे शिक्षीका वंदना गवई, विजया भिसडे, सुषमा देशमुख, ज्योती मोरे, पायल मुंढरे, सुरेखा मेहकरकर, वैशाली बोरचाटे, शाळेचे विद्यार्थी, पालक व शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनीस कर्मचार्‍यांचा मोलाचा वाटा आहे.