निसर्गाच्या कुशीत १६०० चित्र रेघाटले
वर्धा,
निसर्ग सेवा समिती द्वारा निर्मित Oxygen Park: Drawing Competition ऑसिजन पार्क परिसरात निसर्ग सेवा समितीच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत १६०० मुलं, मुलींनी भाग घेतला होता. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी विचार परिषदेचे माजी संचालक भरत महोदय होते तर नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, प्रियदर्शनी महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष अॅड. शितल भोयर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, वन्यजीव रक्षणचे मानद सदस्य संजय इंगळे तिगावकर, चला जाणू या नदी जिल्हा समन्वयक सुनील रहाणे, चित्रकार आशिष पोहणे उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष पांगुळ म्हणाले की, केवळ वृक्षारोपण करून नव्हे तर लावलेल्या वृक्षाचे संवर्धन झाले पाहिजे याकडे निसर्ग सेवा समिती विविध माध्यमातून निसर्ग संवर्धनाचे काम करीत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून हे संतुलन पूर्ववत करायचे असेल तर लोकांच्या मनात निसर्ग प्रेमाची भावना निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. या दृष्टिकोनातूनच निसर्ग सेवा समितीचे वृक्ष संवर्धनाचे कार्य अधोरेखांकित होते असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी केले. चिमुकल्यांना चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून निसर्गा विषयी कृतज्ञता व्यत करण्याची संधी पाल्यासोबतच पालकांनाही उपलब्ध करून देत आहे. हा उपक्रम प्रेरणादायी आहे असे मत अॅड. शितल भोयर यांनी व्यत केले. भारत महोदय, संजय इंगळे तिगावकर, प्रदीप दाते, सुनील रहाणे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
Oxygen Park: Drawing Competition स्पर्धेचे तसेच ऑसिजन पार्क ला या वर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहे त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करताना ऑसिजन पार्क परिसराचा खडतर प्रवास समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी मांडला. हजारो मुलांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता वृक्ष संमेलन चित्र स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक देशमुख, एनोविथ स्टील भूगाव एच आर जनरल मॅनेजर आर. के. शर्मा, माजी बांधकाम सभापती निलेश किटे, भरत महोदय, सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटे, डॉ सचिन पावडे, स्पर्धेस २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल २५ बालगोपाल यांच्या हस्ते करण्यात आले.
Oxygen Park: Drawing Competition परीक्षक म्हणून राजाराम लांजेवार, प्रवीण सावरकर यांनी काम पाहिले. उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभाचे संचालन रुपेश रेंगे, प्राध्यापक रितेश निमसळे यांनी केले तर आभार प्रमोद खोडे यांनी मानले. वर्ग पहिलीच्या मुला मुलींमधून अद्विता अग्रवाल, ईश्वरी चव्हाण कृष्णाई चौधरी तर दुसर्या वर्गाच्या गटातून आरोह डुकरे, रिद्धी वैद्य, नव्या भांडारकर यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय पुरस्कार प्राप्त केले तर तिसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये हंसिका ठाणेकर, वीरा दरणे, रिद्धी मेहेरे तर चौथीच्या मुला मुलींमधून रुद्राक्षी लिडबे, प्रियांश वाणी, निर्मित आगलावे यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार प्राप्त केले. पाचवी ते सातवी गटातून देवयानी शेंडे, तेजश्री भेदरकर, सेजल जाचक, आठवी ते दहावीच्या गटामधून संजीवनी मगर, निधी मुरारका, अविरत कांबळे तर महाविद्यालयीन गटात भावेश पाहुणे, वैशाली पुसाम, विधी राऊत यांनी प्रथम द्वितीय तृतीय पुरस्कार प्राप्त केले. उत्कृष्ट स्पर्धकास आकर्षक स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र वृक्षरोप व पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत सहभाग घेणार्या सर्व स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात आले.