ड्यूटी न लागल्याने पोस्टल मतदानाचा गोंधळ

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
- आयत्या वेळी ड्यूटी रद्द
 
नागपूर, 
महानगरपालिका निवडणुकीसाठी मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांच्या ड्यूटी मतदान केंद्रावर लावण्यात आल्या. यातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या ड्यूटी आयत्या वेळी रद्द झाल्याने त्याना केंद्रावर जाऊन  postal voting पोस्टल मतदान करावे लागल्याने बराच गोंधळ लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या मतदान केंद्रावर पहावयास मिळाला.
 
 
postal
 
महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसह, निमशासकीय कर्मचारी, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचेही मतदान प्रक्रियेसाठी प्रशिक्षण झाले. त्यामुळे आपल्याला मतदान प्रक्रियेतील कर्तव्य पार पाडावे लागणार यासाठी अनेक जण सज्ज होते. परंतु अतिरिक्त मनुष्यबळ लक्षात घेता काहींच्या लागलेल्या ड्यूटी सायंकाळी रद्द झाल्या व त्यांना पोस्टर मतदानासाठी लिफाफे मिळाले. तर काहींना सेंटर न मिळता त्यांच्या पत्त्यावर थेट postal voting  पोस्टल बॅलेट आले. त्यामुळे यातून आपण सुटलो असे अनेकांना वाटत होते, परंतु झोन अंतर्गत त्यांना प्रत्यक्ष मतदान न करता ते टपाल पद्धतीने करणे बंधनकारक होते. त्यामुळे सकाळासूनच अनेक शिक्षक पत्र घेऊन मतदान स्थळी पोहोचले.
 
 
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या विवेकानंद हिदी प्राथमिक शाळेत सकाळपासून या मतदानासाठी कर्मचारी आले असता काहींना सायंकाळी 5.30 नंतर येण्यास सांगण्यात आले. यातील अनेकांनी परतीचा मार्ग धरला तर काहींनी परत येणे परवडत नसल्याने आताच मतदान करू देण्याचा हट्ट धरला. त्यामुळे मतदान आता करायचे की साडेपाच नंतर हा गोंधळ बराच वेळ कायम राहिला. आता करू दिले तर ठीक अन्यथा परत साडेपाच नंतर मतदानाला कोण येणार अशी कुजबूज कायम होती. तसेच प्रशासनाच्या या गोंधळावर अनेकांनी टीकाही केली.