शाई पुसली जाण्याच्या प्रकरणावर राज ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Raj Thackeray expressed his displeasure. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई मनपा निवडणुकीच्या दिवशी सहकुटुंब मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, “सरकार निवडणुका जिंकण्यासाठी कुठल्याही प्रकारची कृती करण्यास मागेपुढे पाहत नाही. दुबारच्या प्रकरणात त्यांनी स्वतः सांगितले की आमचा काही संबंध नाही, मात्र १० लाख मतदारांच्या नावांवर यामुळे गोंधळ निर्माण झाला. व्हीव्हीपॅट वापरला जातो का याची माहिती देण्याचा मार्ग नाही. आता मतमोजणीसाठी ‘पाडू’ नावाचं नवीन यंत्र आणलं आहे, पण त्याची स्पष्ट माहिती आयोगाकडून दिलेली नाही.
 
 

raj thackeray 
राज ठाकरे यांनी मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या अनेक प्रकरणांबद्दलही संताप व्यक्त केला. “शाई लावली जात होती, आता मार्कर पेन वापरला जातोय, बाहेर पडल्यावर सॅनिटायझर वापरल्यास ती शाई निघून जाते. प्रशासन संपूर्णपणे सत्तेसाठी काम करत आहे. आम्ही आमच्या पद्धतीने मतदान करतोय, मात्र ही लोकशाहीची लक्षणं नाहीत,” असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, चुकीच्या मार्गाने निवडणुका जिंकणे आणि बनावट करून सत्तेवर येणं काही सत्तेसाठी येण्यासारखं नाही. आजच्या मतदानाच्या दिवशी नागरिकांनी सतर्क राहावे आणि सत्तेच्या गैरवापरावर लक्ष ठेवावे, असा त्यांनी स्पष्ट इशारा दिला. शिवसैनिक, महाराष्ट्रसैनिक आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.