तेली समाजाचा भव्य वधू-वर परिचय मेळावा १८ जानेवारीला : महेश ढोले

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
यवतमाळ, 
Teli Community: Marriage Introduction तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी यवतमाळ येथील संताजी मंदिराच्या प्रांगणात समाजातील सर्व शाखीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी उपयुक्त ठरणार असून, यंदा हा ३८ वा वधू-वर परिचय मेळावा आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष महेश ढोले यांनी दिली.
 
 
Teli
 
पुढे बोलताना ढोले म्हणाले, या मेळाव्याचे उद्घाटन आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक‘माच्या तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष महेश ढोले राहणार आहेत. या कार्यक‘मास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार व तेली महासभा अध्यक्ष रामदास तडस, महिला काँग‘ेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा महासचिव भूषण कर्डीले, शंकर हिंगासपूरे (अमरावती) यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री संताजी प्रसारक मंडळ अध्यक्ष शैलेश गुल्हाने, संतोष ढवळे, प्रागतिक सहजीवन संस्था अध्यक्ष प्रभाकर सव्वालाखे, समाजसेवक किशोर जिरापुरे (अमरावती), सावजी तेली समाज स्नेही मंडळ, अकोला अध्यक्ष संजय जिरापुरे उपस्थित राहणार आहेत.
 
 
Teli Community: Marriage Introduction या मेळाव्यासाठी आतापर्यंत समाजातील ४८८ उपवर-वधूंची नोंदणी पूर्ण झाली आहे. सुमारे ५ ते ६ हजार समाजबांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. स्वतंत्र बसण्याची व्यवस्था तसेच भव्य मंचाची उभारणी करण्यात येणार आहे. हा परिचय मेळावा समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे अध्यक्ष महेश ढोले यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला सचिव, देविदास देऊळकर, सुरेश अजमिरे, विद्या पोलादे, अशोक जयसिंगपूरे, प्रकाश मुडे, दामोदर मोगरकर, सुरेश जयसिंगपुरे, राजेश चिंचोरे, जितेंद्र हिंगासपूरे, दिवाकर किन्हीकर, उत्तम गुल्हाने, रामकृष्ण मुकुंद पोलादे, नंदकिशोर जिरापूरे, शिवदास गुल्हाने, किशोर गुल्हाने, रश्मी गुल्हाने, राम ढाले, डॉ. संजय अंबाडेकर, बाळासाहेब शिंदे, अभिजित शिंदे, अजाब तंबाखे व समाज बांधव, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.