ट्रॅक्टर पलटून दोन मजूरांचा मृत्यू

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
गोगाव-सायगाव मार्गावरील घटना

ब्रम्हपुरी, 
Tractor accident ट्रॅक्टर पलटून दोघा मजुरांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी आहेत. गुरूवार, 15 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास तालुक्यातील गांगलवाडी जवळील गोगाव-सायगाव मार्गावर झालेल्या अपघातात प्रविण भोयर (35), शिवाजी दोडके (50) (रा. दोघेही गोगाव, ता. ब्रम्हपुरी) मृत्यूमुखी पडले. तर प्रेमदास भजगवळी, अमित गजबे हे दोघे जखमी झाले आहेत.
 

tt 
 
हा Tractor accident ट्रॅक्टर जनकापूर येथील एका ठेकेदाराचा असून, लाकूड कटाई नंतर मजुरांना गोगाव येथे सोडण्यासाठी तो जात होता. ट्रॅक्टर प्रमोद गजबे (रा. गोगाव) हा चालवित होता. ट्रॅक्टरमध्ये एकूण 7 जण बसले होते. गांगलवाडी जवळील गोगाव-सायगाव मार्गावर हा ट्रॅक्टर पलटी झाला. यात प्रविण भोयर, शिवाजी दोडके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच ब्रम्हपुरीचे ठाणेदार कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहे.