- वनविभागाची उच्च न्यायालयात माहिती
अनिल कांबळे
नागपूर,
लहान मुलांचे मनाेरंजन आणि पर्यटनाची व्यवस्था म्हणून सेमीनरी हिल्समधील'Vanbala Train' ‘वनबाला ट्रेन’कडे बघतात. त्यामुळे वनबालाला पूर्वरत साैंदर्य प्रदान करता येणार नाही का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वनविभागाला केली आहे. वनविभागाने तीन महिन्यांत वनबाला ट्रेन सुरू करणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली. यावर न्यायमूर्ती अनिल किलाेर आणि न्यायमूर्ती राज वाकाेडे यांनी ही ट्रेन केव्हापर्यंत सुरू करणार याबाबत एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश वनविभागाला दिलेत.

'Vanbala Train' सेमिनरी हिल्समधील प्रादेशिक वनक्षेत्राची शान आणि लहान मुलांच्या आनंदाचा स्राेत असलेली प्रसिद्ध ‘वनबाला टाॅय ट्रेन’ बंद पडली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. मागील सुनावणीत न्यायालयाने वनबाला ट्रेन केव्हापर्यंत सुरू हाेणार असल्याची विचारणा सरकारला केली हाेती. यावर बुधवारी वनविभागाने येत्या तीन वा सहा महिन्यांत ट्रेन सुरू करणार असल्याची माहिती दिली. दाेन वर्षांपूर्वी माेठ्या उत्साहात पुन्हा सुरू झालेली ही ‘वनबाला टाॅय ट्रेन’ आता जुन्या ट्रॅकच्या झीजेमुळे थांबली आहे. डिसेंबर 2023 मध्ये सात वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर बालाेद्यान परिसरात वनबाला पुन्हा सुरू करण्यात आली हाेती. मात्र, जुने ट्रॅक व वारंवार हाेणाèया तांत्रिक बिघाडांमुळे ही ट्रेन आता पुन्हा थांबवावी लागली आहे. जुने ट्रॅक आता वापरासाठी सुरक्षित नाहीत. त्यामुळे सखाेल दुरुस्तीची गरज आहे. यासाठी आम्ही मध्य रेल्वेशी संपर्क साधणार आहाेत आणि संयुक्त पाहणी करण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती नागपूर प्रादेशिक उपवनसंरक्षक डाॅ.विनिता व्यास यांनी दिली हाेती. जर ट्रॅक बदलणे आवश्यक असेल, तर मध्य रेल्वेच्या मदतीने ते लवकरात लवकर बदलण्यात येईल.डिसेंबर 2023 मध्ये मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत वनबाला पुन्हा धावू लागली हाेती. परंतु अवघ्या दाेन वर्षांतच पुन्हा एकदा ती तांत्रिक कारणामुळे थांबली आहे. काेर्ट मित्र अॅड. जेमिनी कासट यांनी तर सरकारर्ते अॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.