बोटावर लावलेली शाई पुसली जाण्याने मतदारांमध्ये संभ्रम!

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
मुंबई,
voting ink has been wiped off मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये आज मतदान सुरु आहे, पण काही ठळक घटना आणि गोंधळामुळे निवडणूक आयोग पुन्हा चर्चेत आला आहे. मतदानाआधीच पैसे वाटपाचे अनेक प्रकार समोर आले होते, तसेच विरोधकांकडून आयोगाच्या कारभारावर शंका व्यक्त केल्या जात होत्या. आता या पार्श्वभूमीवर मतदानानंतर बोटांवर शाई लावण्याऐवजी मार्करने निशाणी करण्याच्या पद्धतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदानानंतर बोटावर लावलेली निशाणी सहज पुसली जातेय, ज्यामुळे मतदारांना अपाय किंवा गैरफायदा होऊ शकतो, असे निदर्शनास आले आहे.
 
 

bnjghuy 
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सकाळी ९.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ६.९८% इतकी नोंदवली गेली आहे. दादर शिवाजी पार्क येथील बालमोहन विद्यालयातील ईव्हीएम मशीन २० मिनिटे बंद राहिल्याने मतदानाची वेळ वाढवावी लागली. या केंद्रावर राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केले. याच ठिकाणच्या ईव्हीएममध्ये बटण दाबले जात नसल्याने मशिन बदलण्यात आली, अशी माहिती शिवसेनेचे सचिव साईनाथ दुर्गे यांनी सोशल मीडियावर दिली. मतदानानंतर बोटांवर मार्कर पेन वापरल्यामुळे शाई सहज पुसली जातेय. दुर्गे यांनी शिवसैनिक, महाराष्ट्रसैनिक आणि शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणीतरी गैरफायदा घेत नाही याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.
महापालिका आयुक्तांनी मतमोजणीबाबत सांगितले की, आज मतदान आणि मतमोजणीसाठी कमी वेळ असल्याने सर्व महापालिकांमध्ये मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होईल, त्यामुळे निकाल उशीरा जाईल. पाडू मशीनचा मतदान प्रक्रियेशी काही संबंध नाही, असे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिका प्रशासनानेही मान्य केले की, आज मतदानासाठी बोटांवर शाईऐवजी मार्कर पेन वापरण्यात आले असून, नखांवरील शाई सहज पुसली जात असल्याचे निरीक्षण झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मार्कर किट उपलब्ध करून दिले गेले असल्याचेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.