उत्साहात मतदानासाठी पोहोचली महिला, पण समोर आला धक्कादायक सत्य

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
कल्याण,  
kalyan-municipal-corporation कल्याण महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया उत्साहात सुरू असतानाच कल्याण पूर्व भागात गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गायत्री शाळेतील मतदान केंद्रावर एका महिला मतदाराच्या अनुपस्थितीतच तिचे मत नोंदवण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
kalyan-municipal-corporation
 
सुमन भालचंद्र गायकवाड या गुरुवारी दुपारी पती व मुलासह आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गायत्री शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचल्या होत्या. मात्र, ओळखपत्र सादर केल्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्कादायक माहिती दिली. त्यांच्या नावासमोर आधीच मतदान झाल्याची नोंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आणि त्यामुळे त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली नाही. kalyan-municipal-corporation आम्ही अद्याप मतदान केलेले नसल्याचे स्पष्ट करत सुमन गायकवाड यांनी आक्षेप घेतला. तरीही मतदार यादीत त्यांच्या नावासमोर आधीच ‘मार्क’ असल्याने त्यांना मतदानापासून रोखण्यात आले. या प्रकारामुळे गायकवाड कुटुंबाने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कल्याण पूर्वेतील सेंट ल्यूड्स शाळेतील मतदान केंद्रावरही याच स्वरूपाची घटना घडली आहे. रमेश पवार या मतदाराला मतदान करण्यासाठी गेल्यानंतर आपले मत आधीच नोंदवले गेल्याचे समोर आले. kalyan-municipal-corporation निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, कोणीतरी मतदान ओळखपत्राचा वापर करून त्यांच्या नावाने मतदान करून गेले आहे. या सलग घडलेल्या घटनांमुळे कल्याण पूर्व भागातील मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित प्रकारांची तातडीने चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.