आरमोरी,
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट व संघर्ष अपरिहार्य आहेत. संघर्षाशिवाय मिळालेले यश टिकत नाही, याला इतिहास साक्षी आहे, असे प्रतिपादन संस्था सचिव महेश तितीरमारे यांनी केले. स्व. निर्धनराव पाटील Annual gathering at Waghaye College वाघाये शिक्षण महाविद्यालयात आयोजित शैक्षणिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन संस्था सहसचिव अॅड. जयवंत टिचकुले यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती उपसभापती चंदु वडपल्लीवार, संध्या टिचकुले, संस्थेच्या उपाध्यक्षा प्रा. सरला तितीरमारे, नगराध्यक्ष रूपेश पुणेकर, नगरसेवक राहुल तितीरमारे, प्रकाश पंधरे, क्रूनालिनी निमगडे आदी उपस्थित होते.

Annual gathering at Waghaye College महेश तितीरमारे पुढे म्हणाले की, शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून नव्या पिढीमध्ये मूल्यसंस्कार रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करीत असतात. त्यामुळेच समाजाचा खरा सुधारक शिक्षकच असतो, असेही ते म्हणाले. अॅड. जयवंत टिचकुले यांनी मानवी जीवनात साहित्य, संगीत, सौंदर्य व स्नेह यांचे महत्त्व विषद केले. दैनंदिन यांत्रिक जीवनशैलीमुळे निर्माण होणारा मानसिक ताण दूर करून जीवनात चैतन्य निर्माण करण्याचे कार्य शिक्षणातूनच घडते, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, नगरसेवक राहुल तितीरमारे, क्रूनालिणी निमगडे, प्रकाश पंधरे यांचा संस्था सचिव महेश तितीरमारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन हिराणी नवघरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. हेमंत वाढई यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. नलेश राहटे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. राजेश वर्हाडे, हिराबाई तितीरमारे, हिरालाल वालदे, सदानंद सलाम, भगवान गोंदोळे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा. हेमंत वाढई, प्रा. नलेश राहटे, प्रा. अरविंद देशमुख, संजय कोहाडे तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.