महाराष्ट्रात भगवी लाट...भाजपाचा जय महाराष्ट्र

bjp-bmc-nmc-election भाजपाने मानले नागरिकांचे आभार

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
मुंबई,
 
bjp-bmc-nmc-election महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांपैकी 23 ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेत येत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मुंबईसह (mumbai) उर्वरीत महाराष्ट्रातील या विजयासाठी भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांनी थोड्या वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत नागरिकांचे आभार मानले आहेत. भारताचा सांस्कृतिक गौरव आणि आर्थिक समृद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या कार्याला मिळालेला हा जनतेचा प्रतिसाद असल्याचे त्रिवेदी म्हणाले.
 
 
 

bjp-bmc-nmc-election 
 (संग्रहित छायाचित्र)
 
 
bjp-bmc-nmc-election या निवडणुकीत जेन झी म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवा पिढीने भाजपाप्रणित महायुतीला आपले समर्थन दिल्याचे या निकालांवरून जाहीर होत आहे. आपला देश विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करीत असून, हा देशाच्या भविष्यासाठी शुभ आणि सकारात्मक संकेत आहे. नकारात्मक राजकारण करणाèयांना महाराष्ट्रातील जनतेने सडतोड उत्तर दिले आहे, असेही त्रिवेदी म्हणाले. या निकालानंतर इंडि अलायन्स अस्तित्त्वात आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाल्याची टिकाही त्यांनी केली.
 
 
 
bjp-bmc-nmc-election विरोधकांचे ‘बेनकाब चेहरे, दाग बडे गहरे’ असा चिमटा काढून, त्रिवेदी म्हणाले की, ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. ज्याप्रमाणे छत्रपतींची चतुरंग सेना उत्साहाने भारावून पुढे जात होती त्याचप्रमाणे भाजपाचे कार्यकर्ते राष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत आहेत. निवडणूक आयोगाने मतदारांच्या बोटावर लावलेली शाई चुकीची नाही तर, असा विचार करणारे काँग्रेसनेते चुकीचे आहेत, असा प्रत्यारोपही भाजपाने केला.