चंद्रपुरात काँग्रेस व मित्रपक्षाचाच महापौर बसेल

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
* खासदार प्रतिभा धानोरकर व सुभाष धोटे यांचा दावा
* स्वखुशीने आल्यास बंडखोरांसाठीही दारे उघडी

चंद्रपूर, 
Chandrapur : mayor Congress and allied parties चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 27 जागांवर विजय प्राप्त करीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. तसेच मित्रपक्ष असलेल्या जनविकास आघाडीच्या 3 जागा धरून आम्ही 30 जागा मिळविल्या आहे आणि बहुमताच्या अगदी जवळ आहोत. शिवाय आमच्या विचारांच्या अन्य पक्षांशी बोलणी करून आम्ही नक्कीच महापालिकेवर आमचा महापौर बसवू, अशी घोषणा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे झालेल्या पत्रपरिषदेत केली.
 
 
cccccc
 
यावेळी आ. सुधाकर अडबाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, तर शहराध्यक्ष संतोष लहामगे, विनोद दत्तात्रय, रामू तिवारी आदी उपस्थित होते. खा. धानोरकर पुढे म्हणाल्या, लातूरनंतर अवघ्या महाराष्ट्रात आम्ही चंद्रपूर एकहाती जिंकले आहे. गत 2017 च्या निवडणुकीत आमच्या येथे अवघ्या 12 जागा होत्या. आता 27 जागा झाल्या आहेत. शिवाय मित्रपक्षाचे मिळून 30 जागी आम्ही विजयी झालो आहोत. आमच्या जागा दुपटीपेक्षा जास्तीने वाढल्या असून, जनतेने भाजपाला नाकारल्याचे हे द्योतक आहे, असा आरोपही त्यांनी केला.
 
 
Chandrapur : mayor Congress and allied parties  मी स्वतः, आमदार विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे आणि अन्य पदाधिकारी येथे तळ ठोकून होतो. मतदारांनाही बदल हवा होता. जागा वाटपातही आमच्याकडे घोळ झाला नाही. प्रवीण पडवेकर यांना एबी फार्म पाठवला होता. पण त्यांनी अर्जच भरला नाही. नंदू नागरकर यांनाही काँगे्रसचा एबी फार्म पाठवला होता. पण त्यांनी तो स्वीकारला नाही आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ते विजयी झाले आहेत. बंडखोर असले तरी ते स्वखुशीने परत येत असतील तर त्यांच्यासाठी पक्षाची दारे उघडी आहेत, अशीही ग्वाही खा. धानोरकर यांनी यावेळी दिली. चंद्रपूर शहरातील प्रश्न बरीचे आहेत. ते आम्ही सर्व जण मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू. या विजयाने आमच्यात मोठा उत्साह आहे, असेही त्या म्हणाल्या.
आ.विजय वडेट्टीवार यांनी अनुपस्थिती
या पत्रपरिषदेला अपक्ष आमदार सुधाकर अडबाले हेही होते. मात्र, काँगे्रसचे आमदार विजय वडेट्टीवार अनुपस्थित होते. खा. धानोरकर यांनी यशात त्यांच्याही नावाचा उल्लेख केला असता, तर या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याची बाब विजयानंतरही दिसली. ते या संयुक्त पत्रपरिषदेत आलेच नाहीत. त्याबाबत प्रश्न विचारला असता, ते बहुतेक नागपूरला आहेत, असे सुभाष धोटे यांनी सांगितले.
 
जनतेचा कौल मान्यः आमदार किशोर जोरगेवार
चंद्रपूर महानगरपालिकेत आम्हाला जे यश अपेक्षित होते ते मिळाले नाही, हे खरे आहे. अनेक अशा जागा आहेत जेथे आम्हाला विजय प्राप्त होईल असे वाटले होते. त्या जागा अगदीच थोड्या फरकाने आम्ही गमावल्या. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. तरीही जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पक्ष स्तरावर आम्ही सर्व प्रमुख नेते एकत्र येऊन या निकालाचे चिंतन करू आणि येत्या काळात नव्या दमाने, नव्या ताकदीने सामोरे जाऊ. चंद्रपूर महानगराच्या जनतेची सेवा आम्ही करीत आलो आहोत आणि करीतच राहू, अशी प्रतिक्रिया आमदार किशार जोरगेवार यांनी तभाला दिली.