वडकी पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या दहेगाव येथे राजरोसपणे अवैध दारूविक्री सुरू असून महिलांना याचा प्रचंड त्रास होतो आहे. यामुळे गावातील सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. त्यामुळे गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी दहेगावातील शुक्रवार, १६ जानेवारी रोजी दुपारला वडकी पोलिस ठाण्यावर धडक देऊन दारू Demand for a ban on illegal liquor sales विक्री बंदीची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन वडकीचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश देशमुख व सुनील कुडमेथे यांना दिले. दहेगाव येथे अनेक दिवसांपासून अवैध देशी दारू खुलेआम विकली जात आहे. अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व मुलांना नाहक त्रास होत आहे. तसेच विद्यार्थी व तरुणाईदेखील दारूच्या व्यसनाच्या खाईत लोटल्या जात आहे.
दहेगावात अनेक दिवसांपासून Demand for a ban on illegal liquor sales अवैध दारूचा महापूर सुरू आहे. याचा लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहे. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे. ‘साहेब आता तरी अवैध दारू बंद करा’ असा आक्रोश करत संतप्त झालेल्या महिलांनी वडकी ठाण्यावर धडक दिली. यावेळी ‘साहेब आमच्या गावातील दारूविक्री बंद करा हो’ अशी मागणी केली. वडकी पोलिसांनी गावातील अवैध दारू बंद करण्याचे महिलांना आश्वासन दिले. यावेळी निवेदन देताना लक्ष्मी डोंगरे, बेबी खोके, गंगा सातपुते, उज्वला जांभुळकर, प्राजक्ता इटाळे, अर्चना तोडसाम, सोनू देशमुख, वंदना सातपुते, प्रमिला गाढवे, मीरा पोटे, नीता बदखल, मांजरे, मंगला बोभाटे, छबू चौधरी, सरस्वती चव्हाण, वैशाली दातारकर यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.