खुर्सापार जंगलात पहिली पकड; पुढची परीक्षा बाकी

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
उर्वरित वाघांना जेरबंद करा : आ. कुणावार
 
समुद्रपूर, 
गिरड खुर्सापार परिसरात वर्षभर्‍यापासुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या पकडण्याचे आदेश असलेल्या पाच वाघापैकी एका वाघाला ११ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर डोंगरगाव शिवारात जेरबंद करण्यात वनविभागाच्या चमुला यश मिळाले असले तरी उर्वरित ४ वाघांना पकडण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर आहे. Sameer Kunawar आ. समिर कुणावार यांनी समुद्रपूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन अभिनंदन केले. काही प्रमाणात परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी सुरक्षा लक्षात घेऊन त्या उर्वरित ४ वाघांना लवकरात लवकर जेरबंद करा, अशा सुचना आ. कुणावार यांनी केल्या.
 
 
sameer
 
गिरड खुर्सापार परीसरात गेल्या वर्षभर्‍यापासुन तर काही दिवसांपासून समुद्रपुर तालुयातील अनेक गावांमध्ये वाघाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खुर्सापार परिसरातील ५ वाघांना पकडण्यासाठी आ. कुणावार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाघ पकडण्याच्या संबंधित विभागाला आदेश देण्याची मागणी केली होती. त्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान वनमंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन या वाघांना पकडण्याची आग्रही मागणी केली होती.
 
 
त्यासाठी लागणार्‍या कोणत्याही सोयीसुविधांची कमी पडणार नाही. अखेर, ४ जानेवारीला वाघांना पकडण्याचे आदेश देण्यात आले. ११ दिवसांपासून उपवनसंरक्षक हरबिदर सिंग, सहाय्यक वनसंरक्षक हरीलाल सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात वाघाला जेरबंद करण्यासाठी नागझिरा येथील रॅपिड रेस्यू टिम, पिपल फॉर अ‍ॅनिमल्सची चमू वनविभागाच्या विशेष पथकाने तब्बल ५५ कर्मचार्‍यांच्या सहभागाने जंगल परिसरात व्यापक सर्च ऑपरेशन राबविले आहे. वाघ सतत ठिकाण बदलत असल्याने मोहिमेत अनेक अडथळे येत आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन कॅमेरे, पगमार्क ट्रॅकिंग तसेच अनुभवी कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे एका वाघाला बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या जेरबंद करून पेंच व्याघ्रप्रकल्पा नेण्यात आले. करुळ, पवनगाव परिसरात तसेच तालुयातील इतर गावामध्ये वाघाचा वाढता वावर लक्षात घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात यासाठी शासनाकडून लागणारी सर्व मदत पुरविण्यात येईल. या मोहिमेत आपल्या कोणतीही कमतरता पडणार नाही. वाघांचा बंदोबस्त करून नागरिकांची वाघाच्या दहशतीतून लवकरात लवकर सुटका करावी अशा सूचना Sameer Kunawar आ. कुणावार यांनी दिल्या आहेत. यावेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी नवेगाव नागझिरा येथील रॅपिड रेस्यू टिम, पिपल फॉर अ‍ॅनिमल्सची वर्धा आदी उपस्थित होते.