नागपूर,
Job opportunities गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (जी.डब्ल्यू.सी.ई.टी.) येथे पॉवरकॉन व्हेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने पूल कॅम्पस भरती मोहीम यशस्वीपणे पार पडली. या मोहिमेत मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल शाखेच्या डिप्लोमा तसेच बी.ई.बी.टेक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विदर्भातील विविध पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कठोर व पारदर्शक निवड प्रक्रियेनंतर एकूण ५८ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, यापैकी जी.डब्ल्यू.सी.ई.टी.च्या सहा विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली.
संवाद सत्रात विद्यार्थ्यांना पवन व सौर ऊर्जा क्षेत्रातील करिअर संधी, उद्योगाच्या अपेक्षा व कौशल्य सज्जतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. Job opportunities प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांनी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र हे भविष्यातील महत्त्वाचे करिअर क्षेत्र असल्याचे सांगितले. प्रशिक्षण व प्लेसमेंट डीन डॉ. अनिल तिजारे यांनी उद्योग-संलग्न शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवण्यावर भर दिला.
निवड झालेल्या डिप्लोमा विद्यार्थ्यांना ₹४.६९ ते ₹५.१३ लाख, तर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ₹५.२२ ते ₹५.८१ लाख प्रतिवर्ष पगार पॅकेज जाहीर करण्यात आले. हा कार्यक्रम अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनीजी वंजारी, सचिव अॅड. अभिजीतजी वंजारी व कोषाध्यक्षा डॉ. स्मिताजी ए. वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. Job opportunities या उपक्रमामुळे जी.डब्ल्यू.सी.ई.टी.चे उद्योग-संलग्न शिक्षण व हरित ऊर्जा क्षेत्रातील योगदान अधिक भक्कम झाले आहे.
सौजन्य: प्रशांत वैराळकर, संपर्क मित्र