नागरी वस्तीमधील नागरिक भयाभयीत
मानोरा,
Leopard sighted in Manora शहरातील नाईकनगर मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारीला रात्री ९ वाजता स्ट्रीट लाईटच्या प्रकाशझोतात पाण्याच्या फॅटरीजवळ बिबट्यासारखा प्राणी आढळून आल्यामुळे नाईकनगर, वसंतनगर, सैलानीनगर येथील नागरिक भयाभयायीत झाले. यावेळी नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधून वन कर्मचारी यांचे पथक हजर झाल्याने सुटकेचा श्वास सोडत नागरिकांनी सण उत्सव घरातच साजरा केला.

Leopard sighted in Manora शहरातील नाईकनगर, सैलानीनगर आणि वसंतनगर परिसरातील नागरिकांना मकर संक्रांतीच्या दिवशी बुधवारी रात्रीच्या सुमारास रात्रीच्या प्रकाशझोतात बिबट्या सारखा प्राणी अनेक नागरिकांना आढळून आला. या बिबट्या वाघ सारख्या प्राण्याला महिलांनी सुध्दा बघितल्याने नागरी वस्तीत राहणार्या लोकांची धांदल उडाली. भयाभयीत झालेल्या नागरिकांनी वन विभागाच्या टीमला भ्रमणध्वनी करून पाचारण केले. वन पथकातील बारगे यांनी परिसरात पाहणी करून लोकांना धीर दिला. आणि नागरिकांनी रात्रीच्या वेळी आणि पहाटे घराबाहेर पडणे टाळावे, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे असल्यास सोबत काठी आणि बॅटरी सोबत घेऊन जावे, घराच्या आजूबाजूला पुरेसा प्रकाश किंवा स्ट्रीट लाईट सुरू ठेवावे जेणेकरून बिबट्याची हालचाल लक्षात येईल. लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका, याबाबतची खबरदारी घेण्याचे आवाहन केले. याबाबत वन विभागाचे अधिकारी यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क करून विचारले असता बिबट्या असल्याच्या खुणा व हालचाल दिसून आले नाही. याबाबत शोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.