निकालाचा राजकीय 'भूकंप' आणि नितेश राणेंचा 22 सेकंदांचा video व्हायरल

उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्री राम

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Maharashtra municipal election results 2026 महाराष्ट्रातील 29  महापालिका निवडणुकीचे निकाल सोमवारी स्पष्ट झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करत99  जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून आपला ठसा उमठवला आहे. याच दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
 

Maharashtra municipal election results 2026 
मुंबई महापालिका निवडणुकीत 227 जागांसाठी मतदान पार पडले होते. कोणत्याही एका पक्षाला ११४ जागांचा बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही, पण भाजपने 99 जागा जिंकून बहुमताच्या जवळ पोहोचले आहे. यानंतर, भाजपच्या विजयावर मोठी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते जोरात हसताना दिसत आहेत.
 
 
 
 
 
 
 
खिदीखिदी हसून खोचक टोला
 
 
हा 22  सेकंदांचा Maharashtra municipal election results 2026 व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात नितेश राणे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना डिवचत "उद्धवजी आणि पेंग्विनला… जय श्री राम!" असा खोचक टोला लगावतात. या व्हिडीओद्वारे त्यांनी ठाकरे कुटुंबीयांवर साधलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण ताणले आहे.दरम्यान, मुंबई महापालिकेतील निकालाचे कल स्पष्ट होताच ठाकरे गटाला केवळ 63 जागांवर समाधान मानावे लागले. सत्ता स्थापनेसाठी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, कारण भाजपने त्यांना गाठलेले 99 जागांचे संख्याबळ स्पष्ट करत आहे की, यंदाच्या निवडणुकीत मुंबईतील राजकीय समीकरणे काही प्रमाणात बदलली आहेत.नितेश राणे यांच्या या पोस्टमुळे मुंबई महापालिकेच्या निकालावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून राणे यांनी केवळ उद्धव ठाकरे यांना नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य केले आहे, ज्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या समर्थकांकडून विरोधाची लाट उठण्याची शक्यता आहे.भाजपच्या विजयावर सध्या उत्साहाचे वातावरण आहे, तर ठाकरे गटाला पराभवाची झळ बसली आहे. आता मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी कोणतीही तडजोड होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.