घटस्फोटानंतर माही विजचा कारनामा चर्चेत!

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Mahi Vij, Mahi Vij divorce, अभिनेत्री माही विज सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता जय भानुशालीसोबत परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ती सतत प्रसारमाध्यमांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांनीही समजूतदारपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून, मुलांबाबतही आपापल्या सहमतीने निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता माही विजने तिच्या आयुष्यातील एक नवे स्वप्न पूर्ण केले आहे. तिने नवीन कार खरेदी केली असून, या आनंदाची झलक सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे पाहायला मिळाली आहे.
 

Mahi Vij, Mahi Vij divorce, 
माहीने स्वतः तिच्या नवीन Mahi Vij, Mahi Vij divorce, कारचे फोटो शेअर केले नसले, तरी तिची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री आरती सिंगने एक खास पोस्ट शेअर करत माहीचे अभिनंदन केले आहे. आरतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये माही विज तिच्या नवीन कारसमोर पोज देताना दिसत आहे. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये माही अत्यंत सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत असून, तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे जाणवत आहे.हा फोटो शेअर करताना आरती सिंगने एक भावनिक आणि प्रेमळ कॅप्शन लिहिले आहे. तिने माहीच्या मेहनतीचे कौतुक करत तिला पुढे आणखी दहा कार खरेदी कराव्यात, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. “मी खूप, खूप आनंदी आहे. तू पुढे आणखी अशाच दहा कार विकत घे. तू फक्त आनंदाची भूमिका आहेस, मजबूत मुलगी आहेस. देव नेहमीच तुला आशीर्वाद देवो आणि तुझी प्रगती अशीच वाढत जावो,” असे शब्द आरतीने पोस्टमध्ये वापरले आहेत. ही पोस्ट शेअर होताच चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने माहीचे अभिनंदन करत तिच्या नव्या सुरुवातीस शुभेच्छा दिल्या.
 
 
 
दरम्यान, जय Mahi Vij, Mahi Vij divorce, भानुशालीसोबतच्या घटस्फोटानंतर माही विज काही काळ सोशल मीडियावर चर्चेत राहिली होती. तिच्या जिवलग मित्र नदीमसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर माहीने स्वतः एक व्हिडिओ शेअर करत स्पष्ट भूमिका मांडली होती. घटस्फोट हा परस्पर आदराने घेतलेला निर्णय असल्याचे सांगत, अनावश्यक अफवा पसरवल्याबद्दल तिने माध्यमे आणि ट्रोल्सवर नाराजी व्यक्त केली होती.
 
 
माहीने नदीमबाबत बोलताना, तो तिचा जिवलग मित्र असून नेहमीच राहील, असे स्पष्ट केले. तसेच तिची मुलगी तारा नदीमला ‘अब्बा’ का म्हणते, याचेही तिने स्पष्टीकरण दिले. हा निर्णय जय भानुशाली आणि माही दोघांचाही असल्याचे सांगत, ‘अब्बा’ या शब्दाला नकारात्मक अर्थ देणाऱ्यांवर तिने तीव्र शब्दांत टीका केली होती.घटस्फोटानंतरच्या कठीण काळातून बाहेर पडत माही विज आता स्वतःच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू करत असल्याचे तिच्या या नव्या यशातून दिसून येत आहे. नवीन कार खरेदी ही केवळ एक गोष्ट नसून, तिच्या आत्मनिर्भरतेचे आणि पुढे जाण्याच्या जिद्दीचे प्रतीक असल्याचे तिच्या चाहत्यांकडून सांगितले जात आहे.