राज्यात मनसेने उघडले खाते!

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
कल्याण,
MNS opens its account in the state. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 2025-26 च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर आपले खाते उघडले आहे. पॅनल क्रमांक 7D मधून मनसेच्या अधिकृत उमेदवार गणेश लांडगे यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून दणदणीत विजय मिळवला. गणेश लांडगे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला 2362 मतांनी पराभव करत मनसेला कल्याणमध्ये महत्त्वाचे यश मिळवून दिले आहे. या विजयामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कल्याण शहरात मनसेच्या राजकीय उपस्थितीला बळ मिळाले आहे.
 
 
MNS opens
सदर प्रभागात मनसेचे 2 उमेदवार विजयी झाले असून प्रल्हाद म्हात्रे यांच्या प्रचाराचा मोठा परिणाम दिसून आला. स्थानिक प्रश्न, नागरिकांचे मुद्दे आणि संघटित प्रचार यामुळे मनसेला फायदा झाला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कल्याणमध्ये मनसेने खाते उघडल्यामुळे आगामी राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.