शहरात एकही अनुचित घटना नाही
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur Municipal Corporation Election नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालासाठी जवळपास चार हजार पाेलिसांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. पाेलिसांच्या चाेख बंदाे बस्तामुळे शहरात कुठेही अनुचित घटना घडली नाही. तसेच पाेलिस आयुक्त सिंगल आणि पाेलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्वतः बंदाेबस्ताचे नेतृत्व केल्यामुळे काेणतीही निवडणूक मतमाेजनी स्थळावरही काेणतीही गाेंधळाची स्थिती निर्माण झाली नाही. गेल्या चार दिवसांपासून मनपा निवडणुकीसाठी शहरात जवळपास साडेपाच हजार पाेलिस अधिकारी आणि अंमलदारांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता.

Nagpur Municipal Corporation Election आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता शहरातील 10 झाेनमध्ये मतमाेजणीला सुरुवात झाली. सकाळीच सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतमाेजणी स्थळावर माेठी गर्दी केली हाेती. मतमाेजणीला सुरुवात झाल्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी वाढायला लागली. त्यामुळे पाेलिसांचा बंदाेबस्ताचा भार वाढला. त्यामुळे पाेलिसांना रस्त्यावरच माेठ्या प्रमाणात बंदाेबस्त ठेवावा लागला. पाेलिसांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केल्यानंतरही त्यांचा जाेश कायम हाेता. त्यामुळे पाेलिसांना दिवसभर बंदाेबस्तात कायम तैनात राहावे लागले. मात्र, सायंकाळपर्यंत निकाल स्पष्ट झाल्यानंतर सर्व वातावरण जल्लाेषमय झाले आणि आपापल्या प्रभागात विजयी उमेदवार निघून गेले. त्यामुळे पाेलिस दलाकडून करण्यात आलेला बंदाेबस्त अत्यंत सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
वरिष्ठांची मतमाेजणी स्थळाला भेट
पाेलिस आयुक्त सिंगल आणि सहपाेलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी मतमाेजणी केंद्रे, परिसरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात स्वतः भेटी दिल्या. तसेच वाहतूक व्यवस्थेवर काटेकाेर लक्ष ठेवण्यात आले. सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाेलिस मनुष्यबळ तैनात करण्यात आल्याची पडताळणी केली.
जल्लाेष आणि गुलाल
दुपारी चार वाजताच्या सुमारास काही प्रभागातील निकाल स्पष्ट झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बँड, ढाेल, तासे, संदल-डीजेसह जल्लाेष करीत रस्त्यावर आनंदाेत्सव साजरा करीत गुलाल उधळला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था बिघडली हाेती. मात्र, पाेलिसांनी रस्त्याच्या दाेन्ही टाेकांकडून वाहतूक बंद करीत याेग्य नियाेजन केले.