नागपूर,
sant-gajanan-maharaj नागपूर शहरातील विविध परिसरातून संत गजानन महाराजांचे भक्तमंडळी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन मागील चार वर्षांपासून अकोला ते शेगाव (सुमारे ५० किलोमीटर) पायदळ वारी चालवतात. या वार्येचे आयोजन श्रीकांत ईरुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.
या वर्षी ही पायदळ वारी मकरसंक्रांतीच्या औचित्याने १७ जानेवारी रोजी सुरू होणार आहे. वारीचा प्रारंभ अकोला येथील निराला हनुमान मंदिर येथील हनुमानच्या मूर्तींचे पूजन, ध्यान व आरती करून केला जाणार आहे. sant-gajanan-maharaj वारीत जेष्ठ नागरिक, तरुण व बालगोपालांसह विविध वयोगटातील भक्त सहभागी होणार आहेत.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र