पुणे,
ncp-bjp-election-pawar महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाची चव चाखावी लागली आहे. मतमोजणी सुरू झाल्यापासून 2100 वॉर्डांपैकी केवळ 24 जागांवर एनसीपी-एसपीच्या (ncp-sp) उमेदवारांना आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या राष्ट्रवादी पक्षासाठी हे चांगले संकेत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे (maharashtra) महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तर पवारांच्या राष्ट्रवादीने खातेच उघडलेले नाही.
(संग्रहित छायाचित्र)
ncp-bjp-election-pawar मुंबई महानगरपालिकेत एनसीपी-एसपी केवळ एका जागेवर आघाडीवर आहे. या महानगरपालिकेत एकूण 227 वॉर्ड आहेत. मुंबईच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रोफाईल लक्षात घेता, हा एनसीपी-एसपीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये या पक्षाचे उमेदवार प्रत्येकी 4 जागांवर आघाडीवर आहेत. पण, पुणे, कल्याण, नवी मुंबई, उल्हास नगर, वसई-विरार या ठिकाणी एनसीपी-एसपीचे खातेही उघडलेले नाही.
ncp-bjp-election-pawar जळगाव, धुळे, इचलकरंजी, नांदेड, परभणी, जालना, चंद्रपूर, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि पनवेलमध्ये या पक्षाच्या उमेदवारांना आघाडीही मिळविता आलेली नाही. दुसरीकडे पुतणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी 114 वॉर्डांमध्ये आघाडी घेतली आहे. या निवडणुकांमध्ये एनसीपी-एसपी पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असून, काँग्रेससोबत त्यांची युती नाही.