पाळीव कुत्रा किंवा मांजरीचे नोंदणीकरण आवश्यक

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
वर्धा :
Registration of pet dogs, cats is mandatory देशभरात मोकाट प्राण्यांच्या वाढत्या संख्येची दखल घेत तसेच मोकाट कुत्र्यांचे वाढते प्रमाण आणि होणारा इतर त्रास याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचे जन्मदर नियंत्रण तसेच नोंदणी याबाबत राज्यातील मुख्य सचिव यांना सूचना दिल्या आहेत .या सूचनांचे पालन करून राज्यातील सर्व जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचे जन्मदर नियंत्रण अभियान राबविण्यात येत आहे .मोकाट कुत्र्यांना पकडणे व जन्मदर करणे तसेच अँटी रेबीज लसीकरण करणे हा मुख्य उद्देश आहे .जिल्हास्तरीय जिल्हा प्राणिक्लेश प्रतिबंधक समिती (डिस्ट्रिक्ट एस पी सी ए )जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे .या समितीचे सदस्य सचिव उपायुक्त पशुसंवर्धन आहेत .
 
 
dog ds
 
Registration of pet dogs, cats is mandatory उपायुक्तांच्या सूचनाप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद ,नगरपंचायत ,ग्रामपंचायत यांना सूचित करण्यात आले आहे .पाळीव कुत्र्यांचे नोंदणीकरण अनिवार्य करण्यात आलेले आहे ,कारण बरेच वेळा पाळीव कुत्रे चावल्यास किंवा काही दुर्घटना घडल्यास जवाबदारी स्वीकारली जात नाही .पाळीव कुत्र्याचा त्रास झाल्यास तक्रार दाखल होत नाही,या प्रकारामुळे आता पाळीव श्वानाचे नोंदणीकरण आवश्यक करण्यात आलेले आहे .आपल्याकडील पाळीव कुत्र्यांचा दुसऱ्यांना त्रास झाल्यावर बरेच वेळा हा कुत्रा आमचा नाही अशी भूमिका श्वानमालकाकडून घेण्यात येते. यामुळे वर्धा जिल्ह्यातील पाळीव कुत्र्यांची व मांजरीची नोंदणी करण्याची जबाबदारी पीपल फॉर एनिमल्स भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त या संस्थेने स्वीकारली असून याबाबतचा संपूर्ण अहवाल वर्धा जिल्हा प्रशासनात सोपविण्यात येणार आहे .वर्धा जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर बुकदरे, उप आयुक्त डॉक्टर संजय खोपडे तसेच पंचायत समिती वर्धा चे गटविकास अधिकारी श्री शेळके यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून काही श्वान मालकानी आपल्या पाळीव कुत्र्यांची नोंदणी करून घेतली आहे.
 
 
आपले पाळीव प्राण्यांची श्वानांची नोंदणी करायची असल्यास जिल्हा सर्व पशुचिकित्सालय शिवाजी चौक वर्धा तसेच पीपल फॉर एनिमल्स पिपरी मेघे वर्धा येथे संपर्क साधावा किव्वा ९१७२९५२०१६,९४२२१४१२६२ या क्रमांकावर व्हाट्सअप करावा अधिक माहिती करिता या हेल्पलाइनवर संपर्क साधावा अशी माहिती पशुसंवर्धन विभागाद्वारे करण्यात आली आहे.