ए. आर. रेहमान यांचे मोठे वक्तव्य... इंडस्ट्रीतील राजकारण

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
मुंबई,
A R Rahman statement ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान हे केवळ त्यांच्या संगीतातूनच नव्हे, तर त्यांच्या स्पष्ट आणि परखड मतांमुळेही नेहमी चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेहमान यांनी आपल्या करिअरबद्दल, धार्मिक विश्वासांबद्दल तसेच नितेश तिवारी दिग्दर्शित बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटातील कामाबद्दल महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत मिळालेल्या कामाच्या संधी आणि इंडस्ट्रीतील राजकारणावरही त्यांनी भाष्य केले आहे.
 

A R Rahman statement  
मुलाखतीदरम्यान रेहमान A R Rahman statement यांनी स्पष्टपणे सांगितले की, गेल्या आठ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये त्यांना अपेक्षित काम मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामागे इंडस्ट्रीतील राजकारण कारणीभूत असल्याचेही त्यांनी सूचकपणे नमूद केले. तरीही या गोष्टींचा आपल्या सर्जनशीलतेवर परिणाम होऊ दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
‘रामायण’ या चित्रपटासाठी A R Rahman statement संगीत दिग्दर्शन करताना त्यांच्या धार्मिक श्रद्धेची भूमिका होती का, असा प्रश्न विचारण्यात आला असता रेहमान यांनी अत्यंत संयत आणि व्यापक दृष्टीकोनातून उत्तर दिले. “मी ब्राह्मण शाळेत शिक्षण घेतले आहे. दरवर्षी रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकत मोठा झालो आहे. लोक यावर वाद घालू शकतात, पण मी नेहमी चांगल्या गोष्टींना महत्त्व देतो. त्या गोष्टी कुणाकडून शिकल्या गेल्या, हे माझ्यासाठी महत्त्वाचे नसते,” असे ते म्हणाले.रेहमान पुढे म्हणाले की, “पैगंबरांनी सांगितले आहे की ज्ञान अनमोल असते. ते राजाकडून मिळो किंवा भिकाऱ्याकडून, चांगल्या अनुभवांतून मिळो किंवा वाईट अनुभवांतून. कोणत्याही प्रसंगातून पळ काढू नये. लहान विचारसरणी आणि स्वार्थाच्या पलीकडे जाणे गरजेचे आहे. जेव्हा आपण उंच विचार करतो, तेव्हा आपण प्रकाशतो. मला या संपूर्ण प्रकल्पाचा अभिमान आहे. मी मुस्लीम आहे आणि रामायण हा हिंदू धर्मग्रंथ आहे, तरीही या कथेतली मूल्ये सार्वत्रिक आहेत,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.दरम्यान, ‘रामायण’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, या महाकाय प्रकल्पाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत. चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार असून साई पल्लवी प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रवी दुबे, सनी देओल, काजल अग्रवाल, अरुण गोविल आणि इंदिरा कृष्णन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.ए. आर. रेहमान यांच्या या वक्तव्यामुळे कला, धर्म आणि विचारस्वातंत्र्य यावर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली असून ‘रामायण’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.