वर्धा,
Bajaj Science College, स्थानिक बजाज विज्ञान महाविद्यालयात दर दोन वर्षांनी ’सिंटिलेशन’ आणि ’इनरव्हेट’ हे संशोधन-आधारित परिसंवाद आणि परिषद आयोजित करते. याच मालिकेत महाविद्यालय एएनआरएफ प्रायोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद इनरव्हेट २०२६ चे आयोजन २० व २१ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या गांधी स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
परिसंवादाचा विषय ’नॅनोटेनॉलॉजी आणि जैवविविधता संवर्धनातील अलीकडील प्रवाह’ हा आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता पद्मश्री प्रा. जी. डी. यादव, शिक्षा मंडळचे सभापती संजय भार्गव, प्राचार्य प्रा. पी. व्ही. टेकाडे यांच्या हस्ते होणार आहे. या राष्ट्रीय परिसंवादाचे प्रायोजकत्व एएनआरएफ (अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली) यांनी मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स आणि करिअर कट्टा यांच्या संयुत विद्यमाने केले आहे.
पद्मश्री प्रा. जी. डी. यादव, एमेरिटस प्रोफेसर ऑफ एमिनन्स इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेनॉलॉजी मुंबई, प्रा. अरुण जाधव, प्रा. सतीश पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि डॉ. मंदार दातार, शास्त्रज्ञ डी, मॅस-आगरकर संशोधन संस्था, पुणे यांसारखे नामांकित शास्त्रज्ञ आणि वतेविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे आपले विचार मांडतील.
या परिसंवादात जैवविविधता मूल्यांकन आणि संवर्धन, परिसंस्थेचे संवर्धन, नॅनोटेनॉलॉजी आणि त्याचे उपयोजन, पर्यावरणीय उपाययोजना, नैसर्गिक उत्पादने आणि फायटोकेमिकल संशोधन, जैवइंधन, बायोपॉलिमर आणि बायोडिग्रेडेबल साहित्य, घातक कचरा व्यवस्थापन, हवामान बदल आणि जैवविविधतेवरील परिणाम आणि संबंधित क्षेत्रांचा समावेश असेल. देशभरातील जवळपास ४२५ जनांची या राष्ट्रीय परिसंवादासाठी नोंदणी केली आहे. ते ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने आपले सादरीकरण करतील आणि पोस्टर्स सादर करतील.