घरातील सदस्यांचा 'पारा हाय' ओलांडल्या सर्व मर्यादा

बिग बॉस मराठी ६

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Bigg Boss Marathi 6 ‘बिग बॉस मराठी ६’च्या चौथ्या दिवशी घरात रंगलेला कॅप्टनसीचा टास्क प्रेक्षकांसाठी प्रचंड नाट्यमय ठरला. ‘लांडगा आला रे आला’ या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये तीव्र वाद, आरोप-प्रत्यारोप आणि शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या. टास्कच्या दरम्यान झालेल्या गोंधळामुळे अखेर बिग बॉसना खेळ थांबवावा लागला.
 
 

Bigg Boss Marathi 6
 
या कॅप्टनसी टास्कमध्ये लोकर Bigg Boss Marathi 6 गोळा करून मेंढ्या तयार करण्याची जबाबदारी स्पर्धकांना देण्यात आली होती. टास्कदरम्यान बाद होणाऱ्या स्पर्धकाचे गुपित उघड होणार असल्याची घोषणा बिग बॉसने केल्यामुळे स्पर्धा आणखी रंगली. अनुश्री आणि सोनाली टीम ‘ए’मध्ये तर तन्वी, प्राजक्ता टीम ‘बी’मध्ये होत्या. ओमकार आणि सागर टीम ‘ए’कडून खेळत होते, तर विशाल आणि आयुष टीम ‘बी’कडून मैदानात उतरले होते.टास्क सुरू असतानाच ओमकार आणि विशाल यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे रूप हातापायीमध्ये बदलल्याचा आरोप ओमकारने विशालवर केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच बिग बॉसने तात्काळ टास्क थांबवला. टास्क थांबताच तन्वीने सोनालीने आपल्याला कानाखाली मारल्याचा आरोप करत जोरदार आरडाओरडा केला. यामुळे घरातील वातावरण अधिकच तापले.
 
 
 
 

शाब्दिक चकमक
या गोंधळानंतर सागर कारंडे Bigg Boss Marathi 6 आणि तन्वी कोलते यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तन्वीच्या बोलण्यावर संतप्त होत सागरने तिला प्रत्युत्तर दिले, तर तन्वीनेही सागरला अपशब्द वापरले. पुढे सागर आणि अनुश्री यांच्यात चर्चा सुरू असताना तन्वी पुन्हा मध्ये पडली. ‘कॉमेडी करत जातोस’ या तिच्या वक्तव्यावर सागरचा संताप अनावर झाला. कॉमेडी हेच आपले प्रोफेशन असल्याचे सांगत त्याने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. यावर तन्वीने आपण सागरच्या प्रोफेशनवर बोललो नसल्याचे स्पष्टीकरण दिले, मात्र वाद काही केल्या शांत झाला नाही.या संपूर्ण प्रकारानंतर घरातील अनेक सदस्य तन्वीच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करताना दिसले. करणनेही सागरची बाजू घेत, प्रोफेशनवरून कोणालाही बोलू नये, असे मत मांडले. दीपाली सय्यदनेदेखील पुढे येत सागरला पाठिंबा दिला आणि तन्वीसोबत तिचा वाद झाला. घरातील सदस्यांनी तन्वीला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कॅमेरासमोर सतत जोरजोरात बोलत राहिल्याचे दिसून आले.या साऱ्या गोंधळामुळे ‘बिग बॉस मराठी ६’चा चौथा दिवस चर्चेचा विषय ठरला आहे. आता पुढील भागात हा कॅप्टनसी टास्क कसा पुढे जातो, कोण बाजी मारते आणि कोण घराचा नवा कॅप्टन बनतो, हे पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.