लाचखोर उपकृषी अधिकारी Aएसीबीच्या जाळ्यात

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
गोंदिया,
corrupt deputy agriculture प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत रोटावेटरसाठी मिळणार्‍या शासकीय अनुदानाच्या मोबदल्यात लाच मागणार्‍या उपकृषी अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदियाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रमेश मारोतराव टाकरस (50), उपकृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय सालेकसा असे लाचखोर लोकसेवक आरोपीचे नाव आहे. ही कारवाई 16 जानेवारी रोजी सालेकसा येथे करण्यात आली.
 

curraupt 
 
 
तक्रारदार शेतकर्‍याला रोटावेटर अनुदानासाठी शासनाकडून 40 हजार रुप्याचे अनुदान मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक रमेश टाकरस याने 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पडताळणीदरम्यान लाचेची रक्कम 5 हजार रुपये ठरवून ती स्वीकारण्याची तयारी आरोपीने दर्शवली. तक्रारदार शेतकर्‍याच्या खात्यावर 40 हजार रुपयाचे अनुदान जमा झाल्यानंतरही आरोपीने टकरस याने शेकर्‍याकडे वारंवार लाचेची मागणी केल्याने शेतकर्‍याने गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने 12 व 16 जानेवारी रोजी पडताळणी करून सापळा कारवाई करण्यात आली. आरोपी टाकरसला 5 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत सालेकसा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्या घेण्यात आले आहे.corrupt deputy agriculture ही कारवाई पोलिस निरीक्षक उमाकांत उगले यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अरविंद राऊत, फौजदार चंद्रकांत करपे, पोलिस हवलदार संजय बोहरे, मंगेश कहाळकर, पोलिस नाईक संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, संगीता पटले, रोहिणी डांगे, दीपक बाटबर्वे यांनी केली.

शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी व्यक्ति शासकीय, निमशासकीय काम करून देण्यासाठी निर्धारित शासकीय शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.
-उमाकांत उगले
पोलिस निरिक्षक
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया