शेत विमा काढलेल्या शेतकर्‍यांना अटीशर्ती शिवाय पुर्ण रक्कम द्या

सरपंच संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
समुद्रपूर,
Crop Insurance यंदा अतिवृष्टीमुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे सोयाबीन गेले, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आर्थिक कोंडीत सापडला आहे. अनेक शेतकर्‍यांनी पीक विमा काढला होता. मात्र, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अद्यापही शेतकर्‍यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा काढला त्यांना त्यांनी काढलेल्या विम्याची अटी शर्थी न लावता काढलेल्या पुर्ण आराजीची रक्कम द्यावी या मागणीचे निवेदन सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदार कपिल हाटकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
 Crop Insurance, Farmers
यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे गेले, पर्‍हाटीचे वाटोळे झाले आहे. सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मदतीचे पॅकेज जाहीर केले. शेतकर्‍याच्या खात्यात हेटरी ८ हजार ५०० रुपये तर १० हजार रुपये रब्बीच्या बियाण्याने खरेदीसाठी जमा केले. या मदतीमुळे शेतकर्‍यांना आर्थिक दिलास मिळाला असला तरी शेतकर्‍यांची आर्थिक अडचण तसीच आहे. अनेक शेतकर्‍यांनी पैसे खर्च करून आपल्या पिकाचा विमा काढला. अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाल्याने पीक विमा मिळेल अशी आशा शेतकरी बाळगून असताना अद्यापही विम्याचा पत्ता नाही. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा काढला त्यांना त्यांनी काढलेल्या विम्यासाठी कोणताही अटी शर्थी न लावता काढलेल्या पुर्ण आराजीची रक्कम द्यावी अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार कपिल हाटकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
निवेदन देतेवेळी सरपंच संघटनेचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विलास नवघरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश फुसे, सचिव सचिन गावंडे, किशोर नेवल, राजू नौकरकर, मुरलीधर चौधरी, उत्तम घुमडे, जगदीश वरटकर आदींसह सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.