अकोला-शेगाव पायीवारीत भक्तांचा उत्साह

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Shegaon नागपूर शहरातील वेगवेगळ्या परिसरातील संत गजानन महाराजांचे भक्तमंडळी मागील चार वर्षांपासून स्वयंस्फूर्तीने श्रीकांत ईरुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला ते शेगाव अंदाजे ५० किलोमीटरचा पायी प्रवास करत आहेत. यावर्षीही मकरसंक्रांतीच्या शुभसंधीवर अकोला येथील अनोख्या हनुमान मंदिरात पहाटे हनुमंताच्या मुर्तीचे मंगलस्नान पूजन इंजि. सुरेशचंद्र चकोले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नगरसेवक महेश चकोले, नागपूर गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक रमेश मेहर, विनोद निखाडे, स्वप्नील व अमोल चकोले उपस्थित होते.
 
Shegaon
 
भक्तांनी सामुहिक हनुमान चालीसा पठण केले, आरती केली आणि प्रसाद वाटपानंतर "गण गण गणात बोते" हे नामस्मरण करत वारीस प्रारंभ केला. Shegaon लहान मुले आणि जेष्ठ नागरिकही या वारीत सहभागी झाले. भक्तगण भजन गात, जयघोष करत, श्रीक्षेत्र नागझिरा येथे संत गोमाजी महाराजांचे दर्शन घेत शेगाव नगरीत प्रवेश करून "श्री"चे दर्शन व प्रसाद घेत पायीवारीचा आनंद अनुभवला.
 
वारीचे नियोजन श्रीकांत ईरुटकर यांनी केले, तर भक्तांचे आभार विनोद निखाडे यांनी मानले. वारीत सुरेशचंद्र चकोले, प्रीती ईरुटकर, आशा चकोले, कोमल चकोले, गजानन चकोले, प्रज्ञा निखाडे, स्नेहा चकोले, Shegaon मीरा मोतीकर, रमा चकोले, रंजना चकोले, मीट ईरुटकर, कर्मण्य चकोले, रिती ईरुटकर, स्मित चकोले, गाथा चकोले, प्रियंका वंजारी, कृणाली चकोले, गीता दांडेकर यासह अनेक बालगोपाल गजानन भक्त सहभागी झाले.
 
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र