जिल्हा बोअरवेल असोसिएशनचा अनिश्चितकालीन संप

पत्रकार परिषदेत दिली माहिती

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
गोंदिया, 
district borewell associations महागाई, डिझेल दरवाढ आणि बाहेरील जिल्ह्यांतून येणार्‍या बोअरवेल गाड्यांमुळे स्थानिक बोअरवेल चालकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत गोंदिया जिल्हा बोअरवेल असोसिएशनच्या वतीने 14 जानेवारीपासून अनिश्चितकालीन संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 16 जानेवारी रोजी गोंदिया येथील मोदी मैदानावर पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेत असोसिएशनचे अध्यक्ष इकबाल भाई, उपाध्यक्ष सचिन चौरसिया, सचिव नरेश चौधरी यांच्यासह सुनील मेश्राम, रामजी लिल्हारे, लोकनाथ हरिणखेडे, आशीष चव्हान आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
 
 

boarvell 
 
 
संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्याची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, बोअरवेल व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून असंघटित क्षेत्रात मोडतो. जिल्ह्यात 50 बोअरवेल गाड्या आहेत. पैकी 32 गाड्या संपात सहभागी आहेत. शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आश्रीत आहे. मात्र डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही बोअरवेल खननाचे दर अल्प असल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे आता प्रति फूट दर 120 रुपये करण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याचे सांगण्यात आले.district borewell associations असे असले तरी स्पर्धा आणि इतर प्रांतातून येणार्‍या गाड्यांमुळे स्थानिक बोअरवेल चालकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बोअरवेल ड्रिलिंगसाठी किमान आधारभूत दर निश्चित करण्यात यावा, अशी मागणी यावेळी संघटनेने करत दक्षिण भारतासह इतर भागांतून येणार्‍या बोअरवेल गाड्यांवर निर्बंध घालावेत, स्थानिक बोअरवेल चालकांनाच प्राधान्य द्यावे, बोअरवेल व्यवसायाला शासन मान्यता द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा पावित्रा संघटनेने घेतला आहे. यावेळी बोअरवेल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, ब्रोकर, कामगार उपस्थित होते.
...