पुसद,
Gurukul English School, शी शिवाजी शिक्षण संस्था पुसदद्वारा संचालित गुरुकुल इंग्लिश स्कूलचे ‘उडान 2025-26’ हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. पुसद शहराच्या मध्यभागी असलेले बहुजन समाजातील मुलामुलींना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने स्थापन केलेल्या गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या रोपट्याचे वटवृक्षात झालेले रूपांतर ही पुसदकरांसाठी शैक्षणिक पर्वणीच आहे, असे गौरवोद्गार पुसदच्या स्त्रीरोग तज्ञ तथा जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल पुसदच्या सचिव डॉ. अस्मिता मालपाणी यांनी उद्घाटक म्हणून काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्थिरोगतज्ञ तथा जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष डॉ. अमोल मालपाणी, उद्घाटक डॉ. अस्मिता मालपाणी, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा गुरुकुल इंग्लिश स्कूलचे संस्थापक अनिरुद्ध विजय चोंढीकर, संस्थासचिव तथा गुरुकुलच्या अध्यक्ष अश्विनी चोंढीकर, डॉ. शैलेंद्र नवथळे, गुरुकुलचे प्राचार्य अमित ठाकूर यावेळी कला मंचावर उपस्थित होते. सारंग कोरटकर व संच यांच्या सरस्वतीस्तवन व गणेश वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. सर्वप्रथम मान्यवरांनी देवी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. स्वागतानंतर मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे उडवून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
प्राचार्य अमित ठाकूर Gurukul English School, यांनी गुरुकुलमध्ये वर्षभर राबवल्या जाणारे उपक्रम व शैक्षणिक अहवाल सादर केला. अनिरुद्ध चोंढीकर यांनी, ही संस्था उभारण्यात मोलाचा वाटा असणाèया महान शिक्षणप्रेमींचे स्मरण करून त्यांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचे भाग्य प्राप्त झाल्याचे समाधान व्यक्त केले. मुलांमध्ये शैक्षणिक गुंतवणूक करा आपल्या मुलामुलींवर केलेली शैक्षणिक गुंतवणूक नेहमी फायद्याचीच असते ती कधी संपत नाही, असा मौलिक सल्ला त्यांनी पालकांना दिला.
त्यानंतर विविध रंगारंग संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम झाले. युवकांचे प्रेरणास्थान छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ या लघुनाट्याने प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले. जाज्वल्य ढोल पथकाचे सादरीकरण, आई, वडील, शेतकरी, महाराष्ट्रीयन संस्कृती, वारकरी, खेळ ई. सामाजिक समस्येवर प्रकाश टाकणारे विविध कार्यक्रम स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण ठरले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमाची कोरिओग्राफी अमोल भालेराव, साक्षी डोंगरे व स्वप्निल भिसे यांनी केली.