लाखांदूर,
missing man committed suicide तालुक्यातील अंतरगाव परिसरातील शेतशिवारात एका ५२ वर्षीय इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली.प्रदीप दयाराम कुडेगावे (वय ५२), रा. लाखांदूर वॉर्ड क्र. ३, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप दयाराम कुडेगावे (वय ५२), रा. लाखांदूर वॉर्ड क्र. ३, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रदीप कुडेगावे हे शुक्रवार, १६ जानेवारीपासून बेपत्ता होते. कुटुंबीय त्यांचा शोध घेत असतानाच, आज शनिवार (दि. १७ जानेवारी) रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चिचोली-अंतरगाव परिसरातील एका शेतातील विहिरीजवळ काही नागरिकांना चपला आणि मोबाईल आढळून आले.विहिरीजवळ वस्तू बेवारस स्थितीत दिसल्याने कोणातरी व्यक्तीने विहिरीत उडी घेतल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला. याची माहिती तात्काळ लाखांदूर पोलिसांना देण्यात आली.missing man committed suicide
घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीची तपासणी केली असता, त्यात प्रदीप कुडेगावे यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. प्रदीप कुडेगावे यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लाखांदूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शवविच्छेदन अहवालानंतर आणि कुटुंबीयांच्या जबाबांनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.