मुंबई,
MLA Neelam Desai's death मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मागील २५ वर्षांपासून मुंबईवर एकहाती वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे गटाला यंदा पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. निकालानुसार मुंबईत ठाकरे गटाला फक्त ६५ जागा जिंकता आल्या, तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबईतील पराभवानंतर काही वेळातच शिवसेना पक्षासाठी अत्यंत दु:खद बातमी समोर आली. पक्षाच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन निधन झाले. नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्या होत्या आणि त्या काळात ज्या वेळेस राजकारणात महिलांचा सहभाग मर्यादित होता, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता.

निकाल लागल्यानंतर पक्षात शांतता पसरली होती, मात्र काही वेळातच नीला देसाई यांची प्रकृती बिघडली आणि उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत संपली. त्यांच्या निधनामुळे ठाकरे गटाला दुहेरी झटका बसला आहे. नीला देसाई यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.